शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर हासू, हृदयात आसू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:04 IST

मानसिक आजाराची भीती : डिप्रेशन हे मेंदूतील रासायनिक बदलांशी संबंधित स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चेहऱ्यावर सतत हास्य, बोलण्यात उत्साह, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मनमिळावू स्वभाव, पण याच व्यक्तीच्या हृदयात वेदनेची खोल नदी वाहत असते. ही अवस्था म्हणजेच स्माइल डिप्रेशन होय. समोरून पाहणाऱ्याला ती व्यक्ती आनंदी वाटते, पण आतून ती मानसिक संघर्ष, निराशा, एकटेपणा आणि थकलेली असल्याचे दिसते. या मानसिक आजाराची भीती एवढी आहे की, तो लपून राहतो आणि म्हणूनच अधिक घातक ठरतो.

'स्माइल डिप्रेशन' म्हणजे नेमके आहे तरी काय ?स्माइल डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनची ती अवस्था जिथे व्यक्ती चेहऱ्यावर आनंद दाखवते, पण आतून खचलेली असते. ती सामाजिकदृष्ट्या कार्यरत असते, नोकरी, दैनंदिन कामे, जबाबदाऱ्या सांभाळत असते, पण एकांतात गेल्यावर तिला खिन्नता, शून्यता, आत्मगंड, दुःख यांचा सामना करावा लागतो. हे दुखणं दिसणारे नसल्यामुळे अवस्थेतील व्यक्तींकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशावेळी कुटुंबियातील सदस्यांनी संबंधित रुग्णाशी चांगला संवाद साधावा.

तुम्ही या अवस्थेत आहात, कशी मात कराल ?

  • स्वतःशी प्रामाणिक राहावे. डोळस संवान साधावा, विश्वासार्ह मित्र, कुटुंबीय वा समुपदेशक यांच्याशी बोलावे. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
  • मेंदूतील आनंददायक रसायने वाढतात, योग व ध्यानमुळे मन स्थिर राहते, डायरी लिहावी. भावना शब्दांत उतरवणे ही पहिली पायरी. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशकाच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजचे असते.

मानसिक नव्हे, शारीरिक आरोग्यावरही परिणाम

  • स्माइल डिप्रेशन शरीरावरही परिणाम करतो. डोकेदुखी, मणक्याचा त्रास, पचन तंत्रातील बिघाड, रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा धोका, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, हार्मोनल असंतुलन आदी आरोग्यावर परिणाम होतो.
  • विचार, मनोअवस्था व्यक्त करताना बिचकतात सततचा सामाजिक दबाव सर्व काही ठीक आहे, हे दाखवण्याचे अपयश, नात्यातील तणाव किंवा बालपणीचे दुःख, आत्मसन्मान कमी होणे, अशा मनोवस्थेत असलेले व्यक्तीचे विचार बिचकतात.

हा आजार नाही, तर शरीरात केमिकल लोचा !स्माइल डिप्रेशन ही केवळ मानसिक दुर्बलता नसून, मेंदूतील रासायनिक बदलांशी संबंधित स्थिती आहे. विशेषतः सेरोटोनिन, डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन यांचा असंतुलित साव, यासाठी जबाबदार ठरतो. त्यामुळे यात शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम होतो. ही एक सजीव सायकॉलॉजिकल स्टेट आहे.

'स्माइल डिप्रेशन'ची ही ठळक लक्षणेचेहऱ्यावर हास्य पण डोळ्यांत रिकामेपणा, एकांतात रडू येणे किंवा भावनांचा उद्रेक, झोप न लागणे, जास्त झोप येणे, भूक कमी होणे किंवा अनियमित होणे, सतत थकवा जाणवणे, स्वतःबद्दल नकारात्मक विचार, घबराट, उत्साही वाटत असूनही आतून काहीही वाटत नसणे आदी लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळताच संबंधित रुग्णांनी मानसिक रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

"स्माइल डिप्रेशन ही एक अदृश्य मानसिक समस्या आहे. समाजाने हसत खेळणाऱ्या चेहऱ्यांपलीकडे पाहायला शिकले पाहिजे, कारण अनेकदा सर्वात मोठे दुःख मूक, हसते आणि एकटे असते. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांच्या भावनिक आरोग्याकडे जागरूकपणे पाहायला हवे."- डॉ. सचिन हेमके, मानसिक रोग तज्ज्ञ, गडचिरोली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHealthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य