शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कधी डोक्याखाली उशी न घेता झोपून बघा, होतील हे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 11:06 IST

काही लोकांना सवय असते की, त्यांना उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही. तर काही लोका हलकी आणि सॉफ्ट उशी वापरतात.

(Image Credit : SleepSugar)

काही लोकांना सवय असते की, त्यांना उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही. तर काही लोका हलकी आणि सॉफ्ट उशी वापरतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत. जाणून उशी न वापरण्याचे फायदे... 

पाठीच्या कण्याला मिळेल आराम

जर तुमचा पाठीचा कणा फार आधीपासून दुखत असेल तर काही दिवस उशी न वापरता झोपून बघा. तज्ज्ञ सांगतात की, उशीचा वापर केल्याने आपली मान आणि पाठीच्या कण्याचा तणाव वाढतो. त्यामुळे अनेकदा मानेचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे उशी न वापरणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.

त्वचेसंबंधी फायदा

उशीचा सतत वापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. कारण उशीमुळे चेहऱ्यावर दबाव पडतो. जे लोक उशीचा वापर करत नाहीत, त्यांना ही समस्या होत नाही. उशी न वापरल्याने पिंपल्स येण्याची समस्याही कमी होते. कारण उशीचे कव्हर नेहमी धुतले जात नाहीत, त्यामुळे त्यातील धुळ-कण यांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. 

मानेचं दुखणं होईल कमी

जेव्हा आपण उशीचा वापर करतो तेव्हा आपल्या पाठीच्या कण्याची स्थिती बदलते. अशात सतत पाठीदुखीची समस्या होऊ लागते. तसेच उशी न वापरता झोपल्याने मान योग्य दिशेने राहते आणि यामुळे पाठदुखीची समस्या होण्याचाही धोका राहत नाही. 

चांगली झोप लागते

उशी डोक्याखाली घेऊन झोपल्याने अनेकदा काही लोकांना थकवा जावणतो. याचा अर्थ तुमची चांगली आणि पुरेशी झोप होत नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती उशीचा वापर न करता झोपली तर त्याची चांगली झोप होऊ शकते. तसेच इतरही काही समस्या दूर होतात. झोप पूर्ण झाल्यवर तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटतं. 

मानसिक आरोग्य

जर उशी बरोबर नसेल तर तुम्हाला डिस्टर्ब स्लीपची समस्या होऊ शकते. जर तुम्ही उशीचा वापर करत नसाल तर तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. ज्यामुळे तुमचा सर्व थकवा दूर होतो. तणाव कमी होतो. अर्थातच तणाव आणि थकवा तुम्हाला नसेल तर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्यSkin Care Tipsत्वचेची काळजीResearchसंशोधन