Skin censor technology which will tell about your health | आता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर

आता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर

अनेकदा आपण आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लड टेस्टचा आधार घेतो. परंतु आता ब्लड टेस्टची गरज नाही. कारण संशोधकांनी एक स्किन सेन्सर तयार केलं आहे. जे आपल्या घामाची टेस्ट करून तुमच्या तब्बेतीबाबत सांगणार आहे. एवढचं नाहीतर हे सेन्सर तुम्ही अगदी सहज वेअर करू शकता. तसेच हे सेन्सर तुम्हाला शरीरातील पाण्याची कमतरता आणि थकवा यांबाबतही माहिती देणार आहे. 

कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अली जावे यांनी सांगितले की, 'या प्रोजेक्टचा हेतू फक्त स्किन सेन्सर तयार करणं हा नसून आपल्या शरीरातून उत्सर्जित होणारा घाम आपल्या आरोग्याबाबत काय सांगतो हेदेखील जाणून घेण्याचा उद्देश होता. त्यासाठी आम्हाला एका अशा सेन्सरची गरज होती, जो आरोग्याबाबत योग्य माहिती देण्यासाठी उपयोगी पडेल. ज्याचा सतत वापर करणं शक्य असेल. ज्याचा वापर आपल्या शरीराच्या विविध अवयवांवर करणं शक्य असेल. 

सोडिअम आणि पोटॅशिअमच्या प्रमाणाबाबत माहिती...

संशोधकांनी हा सेन्सर एक्सरसाइज करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराच्या विविध अवयवांवर लावण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणारा घाम तसेच त्यामध्ये असलेलं सोडिअम आणि पोटॅशिअमचं प्रमाण जाणून घेणं शक्य झालं. तसेच एक्सरसाइज करताना शरीरामध्ये पाण्याची कमतरता वेगाने होते हेदेखील समजण्यास मदत झाली. तसेच शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या घामाच्या प्रमाणावरून हे समजू शकत की,  हार्ड वर्कआउटवर जाण्याआधी एखाद्या अॅथलिटला कोणत्या गोष्टींबाबत सावधानी बाळगणं गरजेचं असतं. 
घामाचा सॅम्पलही घेता येतो. 

संशोधकांनी तयार केलेल्या स्किन सेन्सरमध्ये माइक्रोस्कोपिक ट्यूब आणि मायक्रोफ्लूड लावण्यात आले आहेत. ज्याच्या मदतीने शरीरातून घामाचा सॅम्पल घेणं अत्यंत आवश्यक असतं. सेन्सर ट्रॅक करतो की, घामाचं किती वेगाने शरीरातून उत्सर्जन होत आहे. अशाप्रकारे सेन्सर यूजरला माहिती देतो की, 'शरीरातून किती घाम उत्सर्जित होत आहे.'

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Skin censor technology which will tell about your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.