शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Depression: तुम्ही नैराश्याच्या गर्तेतुन बाहेर येत आहात हे सांगणारी 'ही' लक्षणे जाणून घ्याच, आहेत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 6:13 PM

तुम्ही नैराश्यातून मुक्त होत आहात, हे कोणत्या आधारावर समजून घ्यावं, याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देऊ.

एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते आणि डिप्रेशनमध्ये (Depression) जाते, तेव्हा त्यातून सावरण्यासाठी तिला वेळ लागतो. मानसशास्त्रज्ञ तुम्हाला नैराश्यातून सावरण्यासाठी मदत करतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीत (Lifestyle) बदल केले जातात. अशा प्रकारे, स्वतःला नकारात्मकतेतून बाहेर काढून सकारात्मक जीवनात परत आणून, आरोग्य आणि प्रकृती दोन्हीमध्ये बदल घडू लागतात.

या उपायांचा वापर करत राहिल्यानं रुग्ण हळूहळू सामान्य जीवनात आल्यानंतर नैराश्यापासून मुक्त होतो. तुम्ही नैराश्यातून मुक्त होत आहात, हे कोणत्या आधारावर समजून घ्यावं, याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देऊ. व्हेरीवेलमाइंडच्या मते, नैराश्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांची काही लक्षणं (Sign) आहेत; ज्यांचा मागोवा घेतल्यास तुम्ही स्वतःमध्ये होणारे सकारात्मक बदल समजू शकता. चला, जाणून घेऊया कोणती (Signs of Depression Recovery) आहेत ती लक्षणं.

नैराश्यातून बरं होण्याची लक्षणं1. आधीपेक्षा चांगलं वाटणंजर तुम्ही पूर्वीपेक्षा स्वच्छ मनानं विचार करू शकत असाल, तुम्हाला भूक लागत असेल, तुम्हाला मानसिक थकवा जाणवत नसेल किंवा तुम्हाला बाहेरच्या जगाबद्दल चांगलं वाटत असेल, तर ही नैराश्यातून सावरण्याची काही सकारात्मक लक्षणं असू शकतात.

2. दैनंदिन कामं करणं किंवा दिनचर्या पाळणंजर तुम्ही दररोज सकाळी ऑफिस किंवा कामासाठी तयार असाल, वैयक्तिक स्वच्छता राखत असाल, वेळेवर खात-पित असाल, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटत असाल, तर हे नैराश्यातून सावरण्याचं लक्षण असू शकतं.

3. कामात मन लागणंडिप्रेशनमध्ये कामावर लक्ष नसतं आणि मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. जे आधी काम करण्यात आणि ठरवलेलं लक्ष्य गाठण्यात आघाडीवर असायचे, त्यांची नैराश्यामुळं जीवनात, करिअरमध्ये पीछेहाट होऊ शकते. पण लोक नैराश्यातून सावरल्यावर ते कामावर पुन्हा एकदा अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात.

5. कमी वैतागणं किंवा चीडचीड कमी होणंजसजशी एखादी व्यक्ती उदासीनतेतून बाहेर येते, तसतशी तिचा चीडचीडेपणा, वैतागलेल्या मनस्थितीत राहणं अशी लक्षणंही कमी होऊ लागतात आणि व्यक्ती विविध गोष्टींचा आनंद घेते आणि सामान्य व्यक्तींप्रमाणे हसूही शकते.

नैराश्याचा मागोवा कसा घ्यावा

  • आपण दैनंदिनी लिहू शकता.
  • रोजची नोंद बनवा आणि प्रत्येक दिवशी स्वतःत होणारे बदल लिहून ठेवा.
  • तुमचं दिवसभरातील कामकाज जसं की व्यायाम, जेवण, लोकांना भेटणं, काम करणं आदी लक्षात ठेवा.
  • एक प्रश्नपत्रिका बनवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नैराश्याची लक्षणं लिहा आणि दर आठवड्याला स्वतःचं परीक्षण करा.
  • अधिकाधिक कामं आणि इतर उपक्रमांमध्ये गुंतण्याचा प्रयत्न करा आणि आपण किती आनंद घेत आहात ते पहा. अशा प्रकारे, आपण स्वत:ला सामान्य जीवनात आणण्याचा प्रयत्न करू शकता आणि नैराश्यापासून मुक्त होऊ शकता.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स