हिवाळ्यात तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 10:12 IST2024-11-28T10:12:11+5:302024-11-28T10:12:41+5:30
Winter Health Tips : तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात तुम्हाला ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपण्याचे साइड इफेक्ट्स माहीत असले पाहिजे.

हिवाळ्यात तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान!
Winter Health Tips : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार रजाई-ब्लॅंकेट अंगावर घेऊन झोपण्याची मजाच वेगळी असते. मात्र, ही मजा तुमच्यासाठी सजाही बनू शकते हे अनेकांना माहीत नसतं. जास्तीत जास्त लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपतात. याने थंडीपासून तर तुमचा बचाव होतो, पण आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा धोकाही वाढतो. तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात तुम्हाला ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपण्याचे साइड इफेक्ट्स माहीत असले पाहिजे.
त्वचेसाठी नुकसानकारक
हिवाळ्यात जेव्हा तुम्ही तोंडावर ब्लॅंकेटमध्ये झोपता तेव्हा ऑक्सीजन ब्लॅंकेटमध्ये योग्य पद्धतीने येत नाही आणि अशुद्ध हवा सुद्धा ब्लॅंकेटमधून बाहेर जात नाही. सोबतच याने त्वचेवर सुरकुत्याही पडू शकतात. त्याशिवाय हिवाळ्यात तोंड झाकून झोपल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीतपणे होत नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि पुरळ अशा समस्या होतात.
फुप्फुसांसाठी नुकसानकारक
तोंडावर ब्लॅंकेट किंवा दुलई घेऊन झोपल्याचा प्रभाव फुप्फुसांवर सुद्धा पडतो. अशाप्रकारे झोपल्याने फुप्फुसात हवा योग्यपणे अदलाबदल होत नाही. ज्यामुळे फुप्फुसं आकुंचन पावतात. अशात अस्थमा, डिमेंशिया किंवा डोकेदुखीची समस्या वाढू शकते. ज्या लोकांना आधीच अस्थमाची समस्या आहे त्यांनी चुकूनही अशाप्रकारे झोपू नये.
वाढतो हार्ट अटॅकचा धोका
जे लोक ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपतात त्यांना हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. असं केल्याने शरीराला योग्यपणे ऑक्सीजन मिळत नाही. ज्याचा थेट प्रभाव हार्टवर पडतो. अशा स्थितीत हार्ट अटॅक किंवा श्वास गुदमरण्याचा धोका वाढतो. त्याशिवाय ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने चक्कर किंवा मळमळही जाणवू शकते.
वजन वाढतं
ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने अप्रत्यक्षपणे याचा प्रभाव शरीराच्या वजनावरही पडतो. तोंड झाकून झोपल्याने शरीराला गरमी मिळते, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती जास्त वेळ झोपते. जेवढा जास्त वेळ तुम्ही झोपाल शरीराचं मेटाबॉलिज्म हळुवार काम करतं, ज्यामुळे शरीराचं वजन वाढतं.