शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कोरोनाकाळातील 'डुमस्क्रोलिंग'मुळे लोक नैराश्याच्या गर्तेत, तुम्ही याचे शिकार नाही ना? घ्या तपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:28 IST

कोरोनाच्या काळात नकारात्मक संदेश, कथांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं संशोधकांना आढळलंय. सोशल मीडियावर फक्त दोन मिनिटे घालवल्यानं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो आणि दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो. यूकेच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच्या (Essex University) सोशल मीडियासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनात ही तथ्यं समोर आली आहेत.

बाहेरच्या जगाच्या नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी घरीच राहणं चांगलं आहे, असं अनेकवेळा वाटतं, परंतु, आजच्या युगात घरात राहूनही तुम्ही बाहेरच्या जगापासून दूर राहू शकत नाही. कारण, तुमचं एक रूप तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल जगातही (Virtual World) फिरत असतं. सोशल मीडियावर फक्त दोन मिनिटे घालवल्यानं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो आणि दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो.

यूकेच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच्या (Essex University) सोशल मीडियासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनात ही तथ्यं समोर आली आहेत. कोरोनाच्या काळात नकारात्मक संदेश, कथांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं संशोधकांना आढळलंय. लोकांनी ट्विटर आणि यूट्यूबवर नकारात्मक बाबी पाहिल्या, तेव्हा ते उदास झाले. इथं एक धक्कादायक ट्रेंडदेखील उदयास आला. वास्तविक, जेव्हा लोकांना कोरोनाशी संबंधित नकारात्मक आणि सकारात्मक बातम्या वाचण्यास देण्यात आल्या, तेव्हा त्यांना नकारात्मक कथांमुळं जास्तच नैराश्य आलं. त्याच वेळी जेव्हा सकारात्मक कथा वाचायला दिली गेली, तेव्हा त्याचा त्याच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही.

काय आहे डूम स्क्रोलिंग? (Doomscrolling)सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्यांचा मनावर अधिक नकारात्मक परिणाम होत असल्याचं संशोधकांना आढळलं आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. कॅथरीन बुकानन (Kathryn Buchanan) सांगतात की, नकारात्मक सोशल मीडियाला डूमस्क्रोलिंग (Doomscrolling) म्हणतात. यामध्ये, स्टोरीच्या माध्यमातून यूजर्सना अशी फीड दिली जाते, जेणेकरून ते जास्तीत जास्त वेळ त्यांच्या स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपवर नकारात्मक कथा, बातम्या वाचत राहतील.

डॉ कॅथरीन पुढे म्हणाल्या की, सोशल मीडियावर नकारात्मक बातम्यांचा ट्रेंड वाढत आहे. अनेकदा या न्यूज फीडमध्ये सत्यताही (authenticity) नसते. अशा परिस्थितीतही लोक त्यांना मिळणारे ऑनलाइन फीड वाचत राहतात. हे आरोग्यासाठी चांगलं नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सSocial Mediaसोशल मीडिया