शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

फणसाच्या बिया खाण्याचे दुष्परीणामही; 'या' रुग्णांनी तर खाऊच नयेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 18:57 IST

फणसाच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट,आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. 

उन्हाळ्यात फणस फार आवडीने खाल्ला जातो. फणस खाण्याचे भरपूर फायदेही आहेत. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम असतं. हे सर्व घटक उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. या फणसामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली असते जी फणसाच्या गऱ्यांइतकीच चवदार लागते. ती सुकवतात. त्या उकडूनही खाल्ल्या जातात आणि त्याची भाजीही केली जाते. इतर भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.  त्या म्हणजे फणसाच्या बिया. या खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट  तसंच आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. 

ब्लडप्रेशर कमी होण्याची शक्यताफणसाच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब कमी होतो. लो बीपी असणाऱ्यांनी फणसाच्या बिया खाणे टाळावे. तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब कमी होईल

साखरेची पातळी कमी होतेफणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या व्यक्तीला हायपोग्लाइसीमिया असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. 

रक्त पातळ होतेरक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण जे आधीच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खात आहेत त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्याने रक्त आणखी पातळ होण्याची शक्यता असते. ज्या लोकांना चयापचयची समस्या आहे अशांनी तर फणसाच्या बिया खाणे टाळावेच.

फणसाच्या बिया खाण्याचे फायदे

  • व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, बी ६, सी असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फणसाच्या बियांचा वापर करावा. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवाव्यात आणि नंतर बारीक पेस्ट करून चेहऱ्याला दररोज लावावी. किमान २५ मिनिटे तरी ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवावी आणि नंतर पाण्याने धूवून टाकावी. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे