जगद्गुरू रामानुजाचार्य जयंतीनिमित्त शोभायात्रा

By Admin | Updated: May 5, 2014 16:34 IST2014-05-05T16:34:27+5:302014-05-05T16:34:27+5:30

९९७वी जयंती : पंचवटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Shobhayatra for Jagadguru Ramanujacharya Jayanti | जगद्गुरू रामानुजाचार्य जयंतीनिमित्त शोभायात्रा

जगद्गुरू रामानुजाचार्य जयंतीनिमित्त शोभायात्रा

>नाशिक : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या औरंगाबाद येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिक जिल्‘ातील संघटनेचे पदाधिकारी राजकीय प्रचारात दिसून आल्याने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, तसेच राज्य, उत्तर महाराष्ट्र व विभागीय कार्यकारिणीत समावेश असलेल्या नाशिक जिल्‘ातील पदाधिकार्‍यांचीही हकालप˜ी करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातील काही राजकीय पक्षांच्या प्रचारफेर्‍यांमध्ये जिल्‘ातील संघटनेचे जबाबदार पदाधिकारी सहभागी झाले होते. सदर बाब लक्षात आल्यामुळे औरंगाबाद येथे प्रदेश कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकारिणीसह राज्य, उत्तर महाराष्ट्र, विभागीय व जिल्हा कार्यकारिणीतील नाशिकच्या पदाधिकार्‍यांची हकालप˜ी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बीडच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षानेही संघटनेच्या नियमाबाहेर जाऊन लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे व ऐनवेळी दुसर्‍या पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे त्याचीही संघटनेतून हकालप˜ी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सदरील बैठक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे-पाटील, रमेश केरे, मनोज मोरे, नरेंद्र मराठे, रवि सवडदकर आदि उपस्थित असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
नवीन कार्यकारिणीसाठी लवकरच बैठक
छावा संघटना ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली एक ज्वलंत क्रांतिकारी युवकांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी संघटनेच्या नियमाबाहेर काम करू नये. नाशिक व बीड जिल्‘ातील संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता नवीन कार्यकारिणी निवडीसाठी प्रदेश कार्यकारिणीची बैठक लवकरच बोलावण्यात येणार आहे. बैठकीची तारीख व वेळ लवकरच कळविण्यात येणार आहे.
- नानासाहेब जावळे-पाटील, कार्यकारी अध्यक्ष, छावा संघटना

Web Title: Shobhayatra for Jagadguru Ramanujacharya Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.