ब्लड कॅन्सर सेल्स शरीरात वेगाने का वाढतात? समोर आलं कारण, सोपे होणार उपचार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:02 AM2020-01-29T11:02:51+5:302020-01-29T11:12:44+5:30

कॅन्सर या जीवघेण्या आजाराचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील लोकांना सर्वात जास्त माहीत असलेला कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे ल्यूकीमिया.

Scientists found a connection between blood cancer or Leukemia cells and vitamin B6 | ब्लड कॅन्सर सेल्स शरीरात वेगाने का वाढतात? समोर आलं कारण, सोपे होणार उपचार...

ब्लड कॅन्सर सेल्स शरीरात वेगाने का वाढतात? समोर आलं कारण, सोपे होणार उपचार...

googlenewsNext

(Image Credit : blogs.biomedcentral.com)

कॅन्सर या जीवघेण्या आजाराचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील लोकांना सर्वात जास्त माहीत असलेला कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे ल्यूकीमिया. हा कॅन्सर लहान मुलं आणि तरूणांमध्ये अधिक होतो. जगभरात लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरमध्ये ल्यूकीमिया पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, यूएसमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये पाचवं सर्वात मोठं कारण आहे ल्यूकीमिया.

ल्यूकीमियाचं सर्वात घातक रूप आहे एक्यूट मायलॉइड ल्यूकीमिया. हा आजार सर्वात घातक मानला जातो, कारण हा फार वेगाने पसरतो आणि यात व्यक्तीची वाचण्याची शक्यता कमी असते. एक्यूट मायलॉइड ल्यूकीमियाच्या रूग्णांमध्ये कॅन्सर सेल्स फार वेगाने विभाजीत होतात. हे सेल्स जेवढ्या वेगाने मारले जातात, तेवढ्या वेगाने वाढतात.

ल्यूकीमिया आणि व्हिटॅमिन B6 

व्हिटॅमिन बी६ आपल्या शरीरातील सर्वच क्रियांमध्ये कामात येतं. हे शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत करतं, तसेच रेड ब्लड सेल्स तयार करतं आणि सेल्स वाढवण्यासही मदत होते. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आले की, व्हिटॅमिन बी६ हाच गुण कॅन्सर झाल्यावर रूग्णासाठी अधिक घातक ठरतो. ब्लड कॅन्सर झाल्यावर व्हिटॅमिन बी६ मुळे रेड ब्लड सेल्स म्हणजेच लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि याच व्हिटॅमिनचा आधार घेऊन कॅन्सर सेल्स वेगाने पसरून शरीराच्या दुसऱ्या भागात पोहोचतात. हा रिसर्च न्यूयॉर्कच्या Cold Spring Harbor Laboratory (CSHL) मधील Lingbo Zhang यांनी केलाय. तर हा रिसर्च Cancer Cell नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

आणखीही काही कारणे...

या रिसर्चसाठी Zhang यांनी एक्यूट ल्यूकीमियाच्या रूग्णांच्या व्हाइट ब्लड सेल्सचा अभ्यास केला आणि त्यांना त्या रूग्णांमध्ये २३० असे जीन्स आढळून आलेत जे ल्यूकीमिया सेल्समध्ये अॅक्टिव होते. त्यानंतर अभ्यासकांनी CRISPR जीन-एडिटिंग टेक्निकच्या माध्यमातून या सर्वच जीन्सचा वेगवेगळा अभ्यास केला. त्यांना ब्लॉक करण्यात आलं. जेणेकरून त्यांची गतिविधि रोखता यावी.  

कसं काम करतं व्हिटमिन बी६?

(Image Credit : drugtargetreview.com)

जेव्हा आपलं शरीर निरोगी आणि फिट असतं तेव्हा आपल्याला व्हिटॅमिन बी६ ची गरज नसते. पण हेल्दी बॉडीमध्ये जेव्हा शरीराला सेल्स विभाजीत करण्याची गरज असते, तेव्हा आपले जीन्स एक खास मेटाबॉलिक एंजाइम रिलीज करतं. याला pyridoxal kinase (PDXK) म्हणतात. पण जेव्हा एखादा रूग्ण ल्यूकीमियाचा शिकार होतो, तेव्हा त्याचे जीन्स अनियंत्रित होतात आणि या एंजाइमला जास्त रिलीज करू लागतात. या एंजाइमच्या आधाराने कॅन्सर सेल्स व्हिटॅमिन बी६सोबत मिळून वेगाने वाढू लागतात.

उपचाराला मिळाली नवी दिशा

या रिसर्चनंतर ल्यूकीमियाच्या उपाचाराला एक नविन दिशा मिळाली आहे. एंजाइम आणि व्हिटॅमिनच्या या संबंधाला समजून घेतल्यानंतर वैज्ञानिक ल्यूकीमियाच्या उपचारासाठी अधिक चांगली ट्रीममेंट डिझाइन करू शकतात. वैज्ञानिकांनी सांगितले की, ल्यूकीमियाच्या रूग्णांना व्हिटॅमिन बी६ असलेले पदार्थ कमी देऊन कॅन्सर वाढण्याची गति कमी केली जाऊ शकते.


Web Title: Scientists found a connection between blood cancer or Leukemia cells and vitamin B6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.