शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

Monsoon: पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या! डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:11 IST

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले  आहे.

पावसाळ्यात खाज, डेंड्रफ  टिनिया (रिंगवर्म), बुरशीजन्य दाणे, ॲथलिट्स फूट यासारखे विकार सर्रास आढळून येतात. या विकारांमागे दमट हवामान आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष ही काही कारणे आहेत. पावसात पडणे, घसरणे किंवा सतत ओलसर कपडे वापरण्याने त्वचेवर होणाऱ्या किरकोळ जखमादेखील बुरशीजन्य संसर्गाचे माध्यम बनतात. या जखमांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संसर्ग शरीरभर पसरू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

त्वचारोगांपासून बचाव कसा कराल? खाज येत असल्यास स्वतःहून औषधे न वापरता डॉक्टरांचा सल्ला घ्या.पावसात भिजल्यानंतर त्वचा कोरडी पुसून घ्या.शक्यतो कॉटनचे आणि सैलसर कपडे वापरा.ओलसर कपडे किंवा बूट जास्त काळ वापरणे टाळा.

पावसाळ्यात त्वचाविकारांत वाढ होते. त्वचेच्या विकारांवर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या काळात ३० ते ४० टक्क्यांनी त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असतात. रुग्णाच्या आजारांची लक्षणे बघून त्यांवर औषधोपचार करण्यात येत असतात. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला जेजे रुग्णालयातील त्वचारोग विभाग, सहयोगी प्राध्यापक  डॉ. रत्नाकर कामत यांनी दिला.

लहान मुलांची विशेष काळजी आवश्यकलहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांना  त्वचाविकारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे भिजल्यानंतर कपडे त्वरित बदलणे, त्वचा कोरडी ठेवणे आणि माती किंवा चिखलात खेळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी आल्यावर अंग स्वच्छ करणे गरजेचे आहे.  

डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार महत्त्वाचेत्वचेवरील कोणताही त्रास काही दिवसांपेक्षा अधिक काळ टिकल्यास किंवा पसरत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा बाजारात सहज मिळणाऱ्या मलमांमुळे त्रास तात्पुरता कमी होतो; पण मुळातील संसर्ग वाढतच राहतो. अनेकदा स्टेरॉइड असलेले मलम केव्हा आणि कुठे वापरावेत, हे अनेकांना कळत नाही. 

टॅग्स :MumbaiमुंबईHealth Tipsहेल्थ टिप्सRainपाऊस