शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
2
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
4
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
5
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
6
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
7
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
8
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
9
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
10
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
11
राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  
12
शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
13
एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ
14
राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार : उदय सामंत
15
आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता
16
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
17
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
18
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
19
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
20
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...

रात्री की दिवसा? काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 1:03 PM

Cucumber benefits :काकडी खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत असतात. पण काकडी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धतही माहीत असली पाहिजे.

Cucumber benefits :  काकडी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच्या डिटेल्स अनेकांना माहीत नसतात. कमी कॅलरी आणि पाणी भरपूर असल्याने काकडी वजन कमी करण्यासोबतच डिहायड्रेशनमध्ये फार प्रभावी आहे. बरेच लोक रोज जेवणासोबत कच्ची काकडी खातात. याशिवाय काकडीचा ज्यूस करून प्याल तर यूरिनरी इंफेक्शनपासून बचाव होऊ शकतो. पण हे सगळे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा काकडीचं योग्यवेळी सेवन कराल. चला जाणून घेऊन त्याबाबत...

काकडी खाण्याची योग्य वेळ

एक्सपर्ट सांगतात की, काकडी दिवसाच खाल्ली पाहिजे. याने मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून बचाव करू शकता. यात 95 टक्के पाणी असते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होत नाही. तसेच याने इम्यूनिटी आणि हाडेही मजबूत होतात.

तुम्ही जर रात्री काकडी खाल्ली तर पोट जड होऊ शकतं. काकडी पचवणं अवघड होऊ शकतं. यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. ज्या लोकांचं पचन कमजोर आहे त्यांनी रात्री काकडी अजिबात खाऊ नये.

जर तुम्ही सकाळी काकडी खात असाल तर याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात. याने तुमचं वजन कंट्रोल होतं. जेवणाच्या अर्धातासआधी तुम्ही काकडी खावी. कारण याला पचायला वेळ लागतो.

काकडी खाण्याची योग्य पद्धत

काकडीच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका. याने तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. 

काकडी केस आणि त्वचेसाठी फार फायदेशीर असते. या फळातील पोषक तत्व शरीराला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळलं तर. कारण काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायलात तर पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. काकडी उन्हाळ्यात फार फायदेशीर मानली जाते. हेल्दी डाएटमध्ये याचं फार महत्व आहे. कारण  यात व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स दूर करतात.

हाडं होतात मजबूत

काकडी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि इम्यूनिटीही वाढते. तेच काकडीची सालही फार फायदेशीर असते. पण हेही लक्षात ठेवा की, काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण त्याने त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.

काकडी खाल्ल्यावर पाणी पिल्याचे नुकसान

- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खाद्य पदार्थांना पचवणारं पोटातील अॅसिड योग्य प्रकारे काम करत नाही.

- जर काकडी खाऊन तुम्ही पाणी प्यायलात तुम्हाला लूज मोशन आणि डायरिया होण्याचाही धोका होऊ शकतो.

- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच लेव्हलही डिस्टर्ब होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य