शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

विनोदाचा तडका 'कॅ री ऑन देशपांडे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 05:27 IST

'कॅरी ऑन देशपांडे'च्या कलाकारांनी 'लोकमत' कार्यालयाला भेट दिली.

 मला साधे सरळ चित्रपट विशेष आवडत नाहीत. त्यापेक्षा निराळं काहीतरी दाखवणारं, त्रांगड करायला लावणारं काम करायला मी पसंती देतो. हा चित्रपटही संपूर्णपणे अशाच काहीशा कथेवर बेतलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला आव्हानात्मक वाटला.- विजय पाटकर, दिग्दर्शक सीमाप्रमाणेच माझादेखील हा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्याच चित्रपटामध्ये पुष्कर श्रोत्रींच्या म्हणजे अगदी त्या सगळ्या संशयी असल्या तरी त्यांच्या अनेक पत्नींपैकी एका पत्नीची भूमिका साकारली आहे.- स्नेहल गोरे, अभिनेत्री हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि मी शशी देशपांडेंच्या अनेक बायकांपैकी एका बायकोची भूमिका साकारली आहे. लहानपणापासून मी विजय सरांना टीव्हीवर सर्वांना हसवताना अनेकदा पाहिलं आहे. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याकडून बरचं काही शिकता आलं.- सीमा कदम, अभिनेत्री मी शशी देशपांडेच्या भाचीची भूमिका साकारत असून, नको त्या वेळेला मध्येमध्ये करणारं हे पात्रं आहे. या भूमिकेमुळे चित्रपटातील सर्वच कलाकारांकडून मला खूप काही शिकायला मिळालं याचा विशेष आनंद आहे.- हेमलता बाने, अभिनेत्री लहानपणापासून विजय सरांसोबत काम करायची माझी इच्छा होती. आणि ती कॅरी ऑन देशपांडेच्या निमित्ताने पूर्ण झाली याचा मला विशेष आनंद आहे. त्यांनी या चित्रपटात माझ्यातील अभिनेत्रीला खेचून बाहेर काढलं आहे असचं मला म्हणावं लागेल. कारण नृत्यांगना ही माझी ओळख असताना त्यांनी माझ्याकडून त्यांना पाहिजे तसा अभिनय करून घेतला आहे.- मानसी नाईक, नृत्यांगना व अभिनेत्री मी यामध्ये प्रमुख भूमिकेत असून महिलांना आधार देणार्‍या शशी देशपांडे हे विनोदी पात्र मी साकारलं आहे. आजूबाजूला घडणार्‍या दूषित वातावरणापासून एका वेगळ्याच कॉमेडी विश्‍वात नेणारा, एकापेक्षा अनेक बायका करणारा आणि त्यांना मानसन्मान देऊन नांदवणारा अशा काहीशा अघटित, कल्पित घटना पाहायला मिळणारा हा चित्रपट आहे.- पुष्कर श्रोत्री, अभिनेता आमच्याकडे २ ते ३ स्क्रिप्ट्स आल्या होत्या. पण त्यामधील 'कॅरी ऑन देशपांडे'ची कथा मला आवडली आणि या चित्रपटाची निर्मिती करायचा निर्णय मी घेतला.- गणेश रामदास, निर्माते काही नवरे किंवा महिला एका जन्मातच आपल्या साथीदाराला कंटाळतात, सात जन्म कुठे एकाच माणसाबरोबर राहणार, दोन बायका एकत्र नांदू नाही शकत, चार-चार कुठे राहणार, अशा अनेक जोक्सना सध्या सोशल मीडियावर पेव फुटले आहेत. जोक्स अपार्ट पण एक पुरुष साधारणत: किती दयावान असू शकतो याचा काही अंदाज लावू शकता? किंवा एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल आणि त्यामुळे तिचं लग्न होत नसताना तर एखादा विवाहित पुरुष तिच्याशी लग्न करतोय असं चित्र कुठे पाहिलं आहे का? आणि ते पण एकदा नाही बरं.. अनेकदा. नाही ना! मग आता पाहा. घाबरू नका.. असं कोणी प्रत्यक्षात करायला जात नाहीये. तर तुम्ही हे पाहू शकणार आहात 'कॅरी ऑन देशपांडे' या चित्रपटात. हा चित्रपट आजच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पाटकर, निर्माते गणेश रामदास, अभिनेता पुष्कर श्रोत्री, नृत्यांगना व अभिनेत्री मानसी नाईक, हेमलता बाने, सीमा कदम व स्नेहल गोरे यांनी शनिवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली.