(Image Credit : news.yahoo.com)
काम करण्याबाबतीत भलेही भारतीय सर्वात पुढे असतील, पण फिटनेस आणि अॅक्टिव राहण्याबाबत भारतीय सर्वात मागे आहेत. एका रिपोर्टनुसार, भारतातील लोक सर्वात कमी एनर्जेटिक असतात आणि रोज सरासरी भारतीय केवळ ६ हजार ५५३ पावलेच चालतात. जे या रिसर्चमध्ये सहभागी सर्वच देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. अमेरिका ब्रिटन, जपान आणि सिंगापूरसहीत १८ देशांतील लोकांच्या डेटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
किती झोप घेतात भारतीय?
रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, भारतीय झोप घेण्याबाबतही फार मागे आहेत. जपाननंतर भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जे सर्वात कमी झोप घेतात. भारतातील लोक सरासरी रात्री ७ तास १ मिनिटेच झोपतात. आयरलॅंडमध्ये लोक सर्वात जास्त सरासरी ७ तास ५७ मिनिटे म्हणजेच जवळपास ८ तास झोप घेतात. १८ देशांमधून एकत्र करण्यात आलेल्या या डेटाच्या आधारावर सांगण्यात आलं आहे की, भारतीय लोक दिवसातील केवळ सरासरी ३२ मिनिटेच एनर्जेटिक राहतात. इतकेच नाही तर हॉंगकॉंगच्या लोकांच्या तुलनेत भारतीय रोज ३६०० पावलेच चालतात.
अर्ध्या रात्रीनंतर झोपतात १८ ते २५ वयातील लोक
तेच झोपेच्या बाबतीत भारतात ७५ ते ९० वर्षाच्या लोकांची स्थितीत आणखी खराब आहे. ते सरासरी ६ तास ३५ मिनिटेच झोपू शकतात. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, १८ ते २५ वर्षाचे भारतीय सरासरी रात्री १२ वाजून ३३ मिनिटांनी झोपतात. तेच वयोवृद्ध लोक त्यांच्या एक तास आधी झोपतात.
चालणे आणि वजन कमी करणे
याआधीही वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आले आहे की, वजन कमी करण्यासाठी पायी चालणे हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागत नाहीत. तसेच याला वेळीची कोणतीही बंधने नाहीत. तुम्ही सकाळी, दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतरही चालू शकता. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी म्हणून किती पावले चालावी? असा प्रश्न अनेकांना पडतो.
किती पायी चालावं?
तुम्ही जर नुकतंच वजन कमी करण्यासाठी पायी चालणे सुरू केले असेल तर तुम्ही तुमचं स्वत:चं एक लक्ष्य ठरवा. सुरूवातीला तुम्ही दररजो १० हजार पावले चालू शकता. एकदा तुम्हाला इतकं चालण्याची सवय झाली की, मग तुम्ही हे वाढवा. नंतर तुम्ही १२ हजार, १५ हजार पावले चालू शकता.
वयानुसार कुणी किती पावले चालावी?
एका रिसर्चनुसार, ६ ते १७ वयोगटातील मुलांनी दररोज १५ हजार पावले चालावीत. तर या वयोगटातील मुलींनी १२ हजार पावले चालावीत. तर १८ ते ४० वयोगटातील महिला आणि पुरूषांनी १२ हजार पावले चालावे. ४० ते ५० वयोगटातील महिलांनी दररोज ११ हजार पावले चालले पाहिजे. तर ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषांनी ११ हजार पावले चालावीत.