कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर सगळंच कंट्रोल ठेवायचंय? डेली डाएटमधून इतक्या कॅलरी करा कमी....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 10:20 AM2019-07-17T10:20:40+5:302019-07-17T10:30:59+5:30

अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, लो-कॅलरी डाएटचं सेवन करून आरोग्याशी संबंधित अनेकप्रकारच्या समस्या दूर होतात.

Reduce 300 calories daily to control cholesterol, blood pressure and sugar level | कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर सगळंच कंट्रोल ठेवायचंय? डेली डाएटमधून इतक्या कॅलरी करा कमी....

कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर सगळंच कंट्रोल ठेवायचंय? डेली डाएटमधून इतक्या कॅलरी करा कमी....

Next

(Image Credit : Medical News Today)

जर तुम्ही हेल्दी असाल आणि तरी सुद्धा तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा फिट रहायचं असेल तर डेली डाएटमधून दररोज काही कॅलरी कमी करून तुम्ही वजन कमी करू शकता. तसेच कॅलरी कमी केल्याने तुमचं आरोग्यही चांगलं राहील. याआधी झालेल्या अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, लो-कॅलरी डाएटचं सेवन करून आरोग्याशी संबंधित अनेकप्रकारच्या समस्या दूर होतात. अशात तुमचं वय वाढलं तरी तुम्ही तरूण दिसाल.

डाएटमधून किती कॅलरी कमी कराव्या

नुकत्याच झालेल्या एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, डेली डाएटमध्ये दररोज केवळ ३०० कॅलरी कमी करून शरीरात कलेस्ट्रॉलचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण आणि ब्लड शुगरचं प्रमाण चांगलं होतं. सोबतच अनेकप्रकारच्या मेटाबॉलिज्मशी संबंधित आजार तुमच्या जवळही भटकणार नाहीत. 

केवळ वेट लॉस नाही तर आरोग्यही चांगलं राहतं

द लॅंसेट डायबिटीस अ‍ॅन्ड इंडोक्रिनोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये या गोष्टीचं समर्थन करण्यात आले आहे की, कमी कॅलरीचं सेवन केल्याने केवळ वजन कमी होतं असं नाही तर तुमचं आरोग्यही चांगलं राहतं आणि शरीरात कॉम्प्लेक्स मेटाबॉलिक बदलही होत नाहीत. रिसर्चमध्ये ही गोष्ट सिद्ध करण्यात आली आहे की, जर तुम्ही तुमच्या दररोजच्या कॅलरी इनटेकमध्ये कमतरता आणाल तर याने ना केवळ वजनच कमी होईल तर डायबिटीस आणि हृदयाशी संबंधित धोकाही कमी होतो.

२ वर्ष कॅलरी इनटेकमध्ये २५ टक्के घट

(Image Credit : Medical News Today)

या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी २१ ते ५० वयोगटातील २०० महिला आणि पुरूषांची निवड केली आणि त्यांना दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागण्यात आले. एका ग्रुपला सांगण्यात आलं की, त्यांना २ वर्षांपर्यंत कॅलरी रिस्ट्रिक्शनची प्रॅक्टिस करायची आहे. या लोकांना सांगण्यात आले की, ते त्यांना हवं ते खाऊ शकतात. पण एक अट आहे. ती म्हणजे त्यांना त्यांच्या रोजच्या कॅलरी इनटेकमध्ये २५ टक्के घट करायची होती. तेच दुसऱ्या ग्रुपला सामान्य रूपाने खाणं-पिणं करण्यास सांगण्यात आलं.

७१ टक्के लोकांचं वजन १० टक्के घटलं

ज्या ग्रुपमधील लोकांना कॅलरी कमी करण्यास सांगण्यात आले होते, त्यांच्यातील जास्तीत जास्त लोक २५ टक्के कॅलरी करण्याचं टार्गेट पूर्ण करू शकले नाहीत आणि २ वर्षात त्यांनी सरासरी कॅलरीमध्ये ११.९ टक्के घट केली होती. जी दररोजच्या ३०० कॅलरीच्या बरोबरीत आहे. अभ्यासकांना आढळलं की, केवळ १ वर्षातच या ग्रुपमधील लोकांच्या कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरमध्ये कमतरता आढळली. सोबतच साधारण ७१ टक्के लोक त्यांचं वजन १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यशस्वी ठरले.

प्रोसेस्ड फूड करा अव्हॉइड

(Image Credit : The Telegraph)

डाएटमध्ये हेल्दी करणे जसे की, फळ आणि भाज्यांचं जास्त सेवन करावं आणि प्रोसेस्ड फूड खाणं कमी करावं. हे दोन्ही प्रभावी उपाय आहेत. या माध्यमातून तुम्ही कॅलरी कमी करू शकता आणि हेल्दी राहू शकता.

Web Title: Reduce 300 calories daily to control cholesterol, blood pressure and sugar level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.