शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कोरोनातून बरे होणाऱ्यांना विषारी, प्रदूषित हवेचा धोका जास्त; या आजाराची लस घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 14:32 IST

CoronaVirus News & Latest Updates :कमी तीव्रतेची लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागतो.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून रिकव्हर झाल्यानंतरही रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनातून बाहेर आल्यानंतर रुग्णांना ज्या समस्या उद्भवतात. त्या स्थितीला लॉन्ग कोविड असंही म्हणतात.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वातावरणतील गारवा वाढणं, हवा प्रदूषण यांमुळे कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांना पुन्हा समस्या उद्भवण्याची शक्यता असते.  कमी तीव्रतेची लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. आरोग्य तंज्ञांनी सांगितले की, हिवाळा आणि वाढत्या प्रदुषणात ही लक्षणं अधिकच गंभीर होऊ शकतात. म्हणूनच कोरोना व्हायरसच्या रिकव्हर्ड रुग्णांना फ्लू या आजाराची लस देण्याचा सल्ला दिला आहे. 

बरं झाल्यानंतरही समस्यांचा सामना 

कोरोना रूग्णांना आजारातून बरं झाल्यानंतरही समस्यांचा सामना करावा लागतो. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल एसोसिएशनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार रोमच्या रुग्णालयात भरती असलेल्या एकूण  १४३ रुग्णांपैकी ८७ %  रुग्णांमध्ये दोन महिन्यांपर्यंत कमीत कमी एक लक्षण दिसून आलं  होतं. रूग्णांना खोकला, सर्दी, थकवा, डायरिया,  सांधेदुखी, मासंपेशीतील वेदना,  फुफ्फुसं आणि  किडनी डॅमेजची लक्षणं दिसून आली होती. अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांना लॉन्ग कोविडमध्ये थकवा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता. 

फ्लू या आजाराच्या लसीने कसा परिणाम होणार

एम्स दिल्लीतील प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी हिंदूस्तान टाईम्सशी  बोलताना सांगितले की, वाढत्या प्रदूषणामुळे, हिवाळ्याच्या वातावरणामुळे, सण- उत्सवातील वाढत्या गर्दीने  आजारांचा धोका उद्भवू शकतो. लॉन्ग कोविडच्या समस्येपासून बचावसाठी फ्लू या आजाराची लस घ्यायला हवी. जेणेकरून इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकेल. देशभारात मोठ्या संख्येने लोक कोरोनातून बरे होत आहेत. एन्‍वार्यनमेंटल रिसर्च जर्नलमध्ये ऑगस्टमध्ये छापण्यात आलेल्या एका माहितीनुसार लहान मुलांच्या फुफ्फुसांतील वायू प्रदुषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी एंनफ्लूएंजा  व्हायरसची लस परिणाकारक ठरू शकेल. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीमुळे लॉन्ग कोविडची समस्या दूर होण्यासाठी फायदा होऊ शकतो. देशात कोरोनाची दुसरी लाट येणार?; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ३ राज्यात कोरोनाचा कहर

२०१८ मध्ये लॅसेंट या वैद्यकिय नियतकालिकात इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चा  एक  अभ्यास छापण्यात आला होता. राष्ट्रीय स्तरावर वायूच्या गुणवत्तेनुसार हवेतील  PM2.5 तील प्रमाण 40 μg/m3 पेक्षा जास्त असू नये. या अभ्यासात नमुद करण्यात आलं होतं की, देशातील जवळपास सगळ्याच राज्यात पसरलेली  ७६.८ टक्के लोकसंख्या PM2.5  कणांच्या हवेत श्वास घेते. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार तेव्हा देशात सगळ्यात जास्त प्रदूषित हवा दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा या राज्यात होती. मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यpollutionप्रदूषणExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला