शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

रात्री झोपेत घाम येणं या गंभीर समस्यांचं आहे लक्षण, वेळीच सावध झालेलं बरं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:35 IST

Reasons For Sweating At Night: काही लोकांना रात्रीच्या वेळीही घाम येतो ज्यामुळे झोपेचीही समस्या होते. या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ ही स्थिती कोणत्या गोष्टींकडे इशारा करते.

Reasons For Sweating At Night:  घाम येणं ही सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउट किंवा हेवी एक्सरसाइज करता किंवा उन्हाळा असेल तर घाम येतोच. पण जर तुम्हाला हिवाळ्यातही घाम येत असेल किंवा एसीमध्येही घाम येत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. काही लोकांना रात्रीच्या वेळीही घाम येतो ज्यामुळे झोपेचीही समस्या होते. या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ ही स्थिती कोणत्या गोष्टींकडे इशारा करते.

रात्री का येतो घाम?

1) टेंशन वाढणं

टेंशन वेगवेगळ्या कारणांनी येतं, जसे की, नोकरीमध्ये समस्या, प्रेम किंवा मैत्रीत दगा, पैशांची अडचण, परीक्षेत नापास होणे किंवा एखादा गंभीर आजार. जेव्हा तुम्ही रात्री झोपताना आयुष्यातील या समस्यांचा विचार करता तेव्हा घाम येऊ लागतो. सगळ्यात गरजेचं हे आहे की, तुमची चिंता दूर करण्याचा उपाय करा. या समस्या दूर झाल्या तर चिंताही राहणार नाही.

2) दारूचं व्यसन

जे लोक खूप जास्त दारूचं सेवन करतात त्यांचं शरीर वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करू लागतं. काही लोकांना लेट नाईट पार्टीजमध्ये अल्कोहोल सेवन करण्याची सवय असते, ज्यामुळे त्यांना झोपताना खूप घाम येतो. मुळात या चुकीच्या सवयीमुळे व्यक्तीचा हार्ट रेट वाढू लागतो. ज्यामुळे त्यांना अस्वस्थता जाणवते आणि मग घाम येऊ लागतो.

3) लो ब्लड शुगर लेव्हल

जर तुमच्या रक्तात शुगरचं प्रमाण कमी झालं तर कोणत्याही वेळी घाम येऊ शकतो. या मेडिकल कंडिशनला हाइपोग्लाइसीमिया (Hypoglycaemia) म्हणतात. जेव्हा रात्रीच्या वेळी ग्लूकोज लेव्हल कमी झाल्यावर एड्रेनालाइन हार्मोन रिलीज होतात. तेव्हा घामाचे ग्लॅंड सक्रिय होतात.

4) औषधाचं सेवन

काही खास औषधांचं सेवन केल्यानेही रात्री घाम येण्याची समस्या होऊ शकते. खासकरून रेग्युलर पेन किलर खाल्ल्याने अशी समस्या तयार होते. यासाठी तुम्ही एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य