शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

दुपारच्या जेवणानंतर का येते झोप? आळस नव्हे खरं कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 18:05 IST

एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

नाश्ता भरपेट झाला किंवा दुपारी अथवा रात्री स्वादिष्ट जेवण जेवल्यानंतर अनेकदा आपल्याला आरामदायी बेडचा विचार मनात येऊ लागतो. विशेषतः दुपारी जेवण (Lunch) झाल्यावर आपल्याला आराम (Rest) जास्त हवाहवासा वाटतो. काही जण ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर जांभया देताना किंवा डुलकी घेताना दिसतात. हा केवळ आळस (Laziness) आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? जेवल्यानंतर आळस येणं किंवा झोप घ्यावीशी वाटणं यामागे काही कारणं आहेत. एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

ऊर्जा मिळावी यासाठी अन्न सेवन केलं जातं; पण जेवल्यानंतर झोप का येते या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी फूड मार्बल (Food Marble) नावाच्या कंपनीनं संशोधन केलं. या संशोधनात त्यांनी खाल्ल्यानंतर सुस्ती आणि झोपेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी शोधून काढल्या. आपण जे अन्न खातो ते झोपेसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतं.

हॉर्मोन्स बजावतात महत्त्वाची भूमिकान्यूट्रिशन एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डॉ. क्लेअर शॉर्ट यांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर आपली आतडी, तसंच संपूर्ण शरीर काम करू लागतं. ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) कमी होणं, हे यामागचं कारण असू शकतं. कारण गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातली ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि नंतर वेगानं कमी होऊ लागते. या क्रियेमुळे थकवा (Fatigue) जाणवतो. यात हॉर्मोन्सदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. जेवल्यानंतर शरीरातलं सेरोटोनिन म्हणजेच फील गुड हॉर्मोन (Feel Good Hormone) झपाट्यानं वाढतं. यामुळे झोप येते. स्पोर्ट्स मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, जेवणानंतरची सुस्ती किंवा आळस हा सेरोटोनिन हॉर्मोनशी संबंधित असतो.

'या' गोष्टींमुळे येते झोपडॉ. शॉर्ट यांच्या मते, 'ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अ‍ॅसिड (Amino acid) असलेले पदार्थ सेवन केल्याने जास्त झोप येऊ शकते. हे अमिनो अ‍ॅसिड पनीर, अंडी, टोफू यांसारख्या उच्च प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये आढळते. याशिवाय ज्या पदार्थांमध्ये मेलाटोनिनचे प्रमाण जास्त असतं, तेदेखील झोपेसाठी कारणीभूत ठरू शकतात. उच्च फायबरयुक्त (High Fiber) पदार्थांचा आहारात समावेश केल्यास झोप, सुस्ती किंवा आळस येण्याची शक्यता कमी होते. याशिवाय प्रमाणात जेवल्यास सुस्ती आणि आळस कमी येतो,' असं डॉ. शॉर्ट यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटके