'फोटोकॉपी' या चित्रपटाची निर्माती - नेहा राजपाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:53 IST
विजय मौर्या लिखित आणि दिग्दर्शित 'फोटोकॉपी' या चित्रपटाची निर्माती होऊन. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रातील आलेले अनुभव नेहा राजपालने 'सीएनएक्स'शी बोलताना शेअर केले.
'फोटोकॉपी' या चित्रपटाची निर्माती - नेहा राजपाल
अभ्यास करून तिने एमबीबीएस केले आणि डॉक्टर झाली. नंतर हे क्षेत्र बदलून किराणा घराण्यातील गुरू विभावरी बांधवकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले, एवढेच नाही तर संगीतकार अनिल मोहिले यांच्याकडून लाईट म्युझिकचेही शिक्षण घेतले. त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या 'माणूस' या चित्रपटातील गाजलेले गाणे 'दिन दिन दिवाळी' हे पहिले गाणे तिने गायले आणि गायन क्षेत्राकडे तिची वाटचाल सुरू झाली. हिंदी चित्रपटातही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बंगाली, कन्नड, तेलगू, सिंधी आणि गुजराती भाषांमध्येही तिने अनेक गाणी गायली. अंताक्षरी या कार्यक्रमासाठी तिने अँंक रिंगही केले. या गायिकेचे नाव नेहा राजपाल. पण तरीही अजूनही काहीतरी आपल्याकडून राहतंय अशी नेहाला खंत होती.. ही खंत तिने दूर केली विजय मौर्या लिखित आणि दिग्दर्शित 'फोटोकॉपी' या चित्रपटाची निर्माती होऊन. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रातील आलेले अनुभव नेहा राजपालने 'सीएनएक्स'शी बोलताना शेअर केले. सध्या असे अनेक निर्माते असे आहेत, की जे येतात..एका चित्रपटाची निर्मिती करतात आणि फायदा झाला तर पुढचा चित्रपट काढतात, नाहीतर गायब होतात. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, की चित्रपटांची संख्या फक्त वाढते आणि त्याचा फटका वर्षानुवर्षे या क्षेत्रात असलेल्या निर्मात्यांनाही बसतो. त्यामुळे वन टाईम प्रोड्युसर्सनी निर्मिती क्षेत्रात येण्यापूर्वी पूर्ण विचार करूनच यायला हवे. या क्षेत्रात यायचेच असेल तर अनुभवी निर्मात्यांच्या सहयोगाने यावे.निर्मिती क्षेत्रात चांगली कथा, पटकथा, चित्रपटाच्या कथेला सूट होईल असेच कास्टिंग निवडणे, शूटींगच्या वेळी येणार्या समस्या, एडिटिंग आणि सर्वांत शेवटचे म्हणजे प्रमोशन, यातील प्रत्येकच टप्पा आव्हानात्मक आहे. आपल्याकडे शक्यतो पटकथेवर विशेष काम केलं जात नाही.तयार कथा घेऊनच त्यावर पटकथा तयार केली जाते. पण आम्ही सर्वांत पहिले मार्केट रिसर्च करून लोकांना काय बघायला आवडेल याचा वेध घेतला. कारण आपण बनवणार एक आणि लोकांना ते आवडलंच नाही तर चित्रपटाच्या टीमचा आणि दोन्हीचा वेळ फुकट जातो. त्यामुळे लोकांना आवडेल अशी कथा तयार करतानाच लोकांना आवडेल ना हा विचार केला आणि त्याबरोबरच ती सहज प्रमोट करता येईल ना असा उलटा विचार केला. आमच्या चित्रपटाच्या टीमने कास्टिंगसाठी जवळपास आठ महिने मेहनत घेतली.