जागतिक डायबिटीस डे ला बदामांसह आरोग्‍यदायी जीवनशैली अंगिकारण्‍याचे वचन घ्‍या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 02:24 PM2019-11-08T14:24:23+5:302019-11-08T14:25:36+5:30

इंडियन डायबिटीज फेडरेशनचा अंदाज आहे की, २०२५ पर्यंत हा आकडा दुप्‍पट वाढ होऊन १३४ दशलक्षपर्यंत पोहोचण्‍याची शक्‍यता आहे.

Pledge for a healthier lifestyle with Almonds, this World Diabetes Day | जागतिक डायबिटीस डे ला बदामांसह आरोग्‍यदायी जीवनशैली अंगिकारण्‍याचे वचन घ्‍या!

जागतिक डायबिटीस डे ला बदामांसह आरोग्‍यदायी जीवनशैली अंगिकारण्‍याचे वचन घ्‍या!

googlenewsNext

दरवर्षी जागतिक मधुमेह दिन एक मोहिम म्‍हणून साजरा केला जातो. या मोहिमेअंतर्गत भारतभरातील ७२ दशलक्षहून अधिक लोकांवर परिणाम करणा-या आणि देशभरात हळूहळू सामान्‍य आजार बनत चाललेल्‍या आजाराबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो.

इंडियन डायबिटीज फेडरेशनचा अंदाज आहे की, २०२५ पर्यंत हा आकडा दुप्‍पट वाढ होऊन १३४ दशलक्षपर्यंत पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्‍याचे गंभीर आव्‍हान आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या मते काही कारणांमुळे मधुमेहाने पीडित भारतीयांच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ झाली आहे. यामध्‍ये झपाट्याने होत असलेले शहरीकरण, बैठेकाम करण्‍याची जीवनशैली, वाढत्‍या जीवनविषयक अपेक्षा आणि अनारोग्‍यकारक आहार अशा घटकांचा समावेश आहे. 

यंदाच्‍या वर्षाची थीम 'कुटुंब आणि मधुमेह' आहे. चला तर मग काही सुलभ, पण महत्‍त्‍वाचे बदल करत आपण आपल्‍या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे कशाप्रकारे संरक्षण करू शकतो, याचे विश्‍लेषण करू या. खाली काही सूचना देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या या जीवनशैली आजारावर उत्तमपणे नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत करू शकतात: 

सूचना १: अल्‍पोपहारामध्‍ये बदल करा!

टाइप २ मधुमेहाने पीडित रूग्‍णांसाठी आजारावर नियंत्रण ठेवण्‍याची पहिली पायरी म्‍हणजे आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयी. पुढील पायरी म्‍हणजे योग्‍य अल्‍पोपहार. आपल्‍यापैकी अनेकजण परिणामांची चिंता न करता तळलेले किंवा अनारोग्‍यकारक अल्‍पोपहाराचे सेवन करतात. यामध्‍ये हळूहळू बदल करण्‍याचा सोपा मार्ग म्‍हणजे नेहमीच्‍या अल्‍पोपहारामध्‍ये बदल करत राहा. नेहमीच सेवन करत असलेल्‍या खाद्यपदार्थांच्‍या ऐवजी बदाम, दही सेवन करा. हे पदार्थ आरोग्‍यदायी असून भूकेचे शमन करतील. तसेच एकूण आरोग्‍य सुदृढ राखण्‍यामध्‍ये देखील मदत करतील. 

योग्‍य आहार सेवनाच्‍या महत्‍त्‍वावर भर देत आघाडीची बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाली, ''आपण भारतीयांना गोड किंवा चवदार अल्‍पोपहार खूप आवडतो. आपल्‍यापैकी अनेकजण त्‍यांचा भरपूर आस्‍वाद घेतो. काळानुरूप या गोष्‍टीचे प्रतिकूल परिणाम होऊ लागतात. यामध्‍ये बदल करण्‍याचा उत्‍तम मार्ग म्‍हणजे आरोग्‍यदायी अल्‍पोपहाराचे सेवन करणे. माझ्या बाबतीत मी भाजलेले किंवा चवदार बदाम, ताजी फळे किंवा ओट्स एका डब्‍यामध्‍ये ठेवत योग्‍यवेळी सेवन करण्‍याची खात्री घेते. मी कॅलरीज न देणा-या अनारोग्‍यकारक पदार्थांचे सेवन करत नाही.'' 

सूचना २: सक्रिय राहण्‍याचा मार्ग स्‍वीकारा!

नियमितपणे व्‍यायाम करणे हे रक्‍तातील शर्करेवर नियंत्रण ठेवण्‍याचा प्रयत्‍न करणा-यांसाठी उत्‍तम आहे. यामुळे रक्‍तदाब व वजनावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत होते. तसेच ऊर्जा पातळी देखील योग्‍य राहते आणि मधुमेहाने पीडित रूग्‍णांमध्‍ये सामान्‍यपणे आढळून येणा-या कोणत्‍याही हृदयविषयक आजारांचा धोका कमी होतो. दररोज थोडा-थोडा व्‍यायाम करत सुरूवात करा आणि दररोज हळूहळू व्‍यायाम ३० मिनिटे किंवा १ तासांपर्यंत वाढवा. काळानुरूप यामुळे आजारावर उत्‍तमपणे नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत होईल. 

पिलेट्स तज्ञ आणि आहार व पोषण सल्लागार माधुरी रुईया म्‍हणाल्‍या, ''मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. नित्‍यक्रमामध्‍ये व्‍यायामाची भर करत या आजारावर उत्‍तमपणे नियंत्रण ठेवता येते. काहीजणांसाठी व्‍यायाम हा ताण दूर करणारा असू शकतो, पण अनेकांना यासाठी अथक प्रयत्‍न करावे लागतात. मधुमेहासारख्‍या आजारापासून पीडित असताना स्‍वत:ला सक्रिय जीवनशैली जगण्‍याप्रती झोकून देणे महत्‍त्‍वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की, नेहमी व्‍यायामशाळेत गेले पाहिजे. साधेसोपे बदल करत सुरूवात करा, जसे लिफ्टचा वापर न करता जिन्‍याचा वापर करा किंवा कामाच्‍या वेळी काहीसा ब्रेक घेऊन शतपावली करा. असे केल्‍यास तुम्‍हाला बदल जाणवतील.'' 

माधुरी यांच्‍याशी सहमती दाखवत फिटनेस उत्‍साही व सुपरमॉडेल मिलिंद सोमण म्‍हणाले, ''तुमच्‍या आवडीच्‍या व्‍यायामाची निवड केल्‍याने तुम्‍हाला तंदुरूस्‍त व प्रेरित राहण्‍यामध्‍ये मदत होईल. माझा सल्‍ला आहे की तुम्‍हाला विशिष्‍ट नृत्‍यप्रकार, धावणे, पोहणे किंवा ऐरोबिक्‍सचा आनंद घ्‍यायला आवडत असेल तर तीच गोष्‍ट करा. मी तुमच्‍या फिटनेस नित्‍यक्रमाला पूरक असा आहार सेवन करण्‍याचा देखील सल्‍ला देतो. अनारोग्‍यकारक अल्‍पोपहाराच्‍या ऐवजी बदामासारख्‍या आरोग्‍यदायी पर्यायाची निवड करा. बदाम हे व्‍यायामापूर्वी किंवा व्‍यायामानंतर कुरकुरीत व स्‍वादिष्‍ट पदार्थाचा आस्‍वाद देतात.'' 

सूचना ३: वजनावर लक्ष ठेवा! 

लठ्ठपणा आणि पोटावरील चरबीमुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता असते. अलिकडील अभ्‍यासातून देखील निदर्शनास आले की, मधुमेहाने पीडित रूग्‍ण लठ्ठ असल्‍यास त्‍यांच्‍यामध्‍ये वजन योग्‍य असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत हृदयविषयक आजारांचा धोका कमी होण्‍याची शक्‍यता कमी असते. काही अभ्‍यासांनी यशस्‍वीरित्‍या वजन कमी केलेले व वजनावर नियंत्रण ठेवणारे लोक आणि वजन जास्‍त असलेले, विशेषत: टाइप २ मधुमेहाने पीडित लोक यांच्‍यामधील कार्डियो मेटाबोलिक धोक्‍यासंदर्भात थेट तुलना केली आहे. हे अभ्‍यास सांगतात की, जाणकार राहत वजनावर नियंत्रण ठेवण्‍याचे प्रयत्‍न करणे हा टाइप २ मधुमेहावर उत्‍तमपणे नियंत्रण ठेवण्‍यामधील महत्‍त्‍वाचा पैलू आहे. यामुळे जीवनशैलीचा सर्वांगीण विकास होईल.

सूचना ४: नोंद ठेवा!

रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍याचा आणखी एक उत्‍तम मार्ग म्‍हणजे तुमच्‍या रोजच्‍या सेवनाची आणि नित्‍यक्रमाची नियमितपणे नोंद ठेवा. यामध्‍ये दिवसभरात केलेल्‍या चिंतनाचे प्रमाण, सेवन केलेले पदार्थ, शारीरिक व्‍यायामाची माहिती, तसेच दिवसभरात ताण दिलेल्‍या गोष्‍टी यांची नोंद करू शकता. काळानुरूप ही नोंद तुमच्‍या प्रगतीबाबत सखोल माहिती देईल. तसेच तुमच्‍या जीवनशैलीवर उत्‍तमपणे व अधिक संघटितपणे नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये देखील मदत होईल. 

Web Title: Pledge for a healthier lifestyle with Almonds, this World Diabetes Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.