(Image Credit : cosmosmagazine.com)

वेगवेगळ्या आजारांची वेगवेगळी कारणे नेहमी रिसर्चमाध्यमातून समोर येत असतात. अशाच एका आजाराबाबत एक आश्चर्यकारक खुलासा रिसर्चमधून समोर आला आहे. ज्या लोकांची उंची सरासरीपेक्षा कमी असते, त्यांना तसाही समाजात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वेगवेगळ्या गोष्टी त्यांना ऐकाव्या लागतात. अशात कमी उंची असणाऱ्यांच्या आरोग्याबाबत एक नवीन समस्या समोर आली आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, उंच लोकांच्या तुलनेत कमी उंची असलेल्यांना टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक असतो.

१० सेंटीमीटर उंची असेल तर डायबिटीसचा ३० टक्के धोका कमी

(Image Credit : medicalnewstoday.com)

edition.cnn.com च्या वृत्तानुसार, उंचीमध्ये सरासरी दर १० सेंटीमीटरच्या वाढीने डायबिटीसचा धोका ३० टक्क्यांनी कमी राहतो. पुरूषांच्या उंचीत सरासरी दर १० सेंटीमीटरची वाढ झाल्यास डायबिटीसचा धोका ४१ टक्के कमी होतो, तर महिलांमध्ये दर १० सेंटीमीटर उंची वाढल्यास डायबिटीसचा धोका ३३ टक्क्यांनी कमी होतो. याचा अर्थ सरासरी अमेरिकेतील पुरूष ज्यांची उंची १७७.१ सेंटीमीटर असते, त्यांच्यात डायबिटीस होण्याचा धोका भारतीय पुरूषांच्या तुलनेत ५० टक्के कमी असतो. कारण भारतीय पुरूषांची सरासरी उंची १६४.९ सेंटीमीटर असते.

काय आहे टाइप २ डायबिटीस?

(Image Credit : www.webmd.com)

टाइप १ डायबिटीस ही एक जन्मजात येणारी समस्या आहे. ज्यात शरीर इन्सुलिन अजिबातच तयार करू शकत नाही आणि जगभरात आढळणाऱ्या डायबिटीसच्या केसेसपैकी केवळ १० टक्के केसेस टाइप १ डायबिटीसच्या असतात. तेच टाइप २ डायबिटीसमध्ये शरीरात इन्सुलिन तर तयार होतं, पण कमी तयार होतं. ज्यामुळे शरीर ग्लूकोजचं शोषण करू शकत नाही. आणि ग्लूकोज रक्तातच राहतं. असं जास्त काळासाठी झालं तर याने लठ्ठपणा, दृष्टी नसणे, किडनी डॅमेज, हार्ट डिजीज, स्ट्रोक आणि अवयवांचं नुकसान यांसारख्या समस्या होऊ शकतात. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननुसार, जगभरात ४२ कोटी लोक डायबिटीसच्या समस्येने पीडित आहेत.

लांब पाय असलेल्यांना डायबिटीसचा धोका कमी

(Image Credit : liv3ly.com)

मेडिकल जर्नल डायबीटोलॉजियानुसार, जर तुमचे पाय लांब असतील तर फिजिकल फीचरच्या दृष्टीने तर चांगलं आहेच, सोबतच यामुळे तुम्हाला डायबिटीसचा धोकाही कमी राहतो. तुमचे पाय जेवढे लांब असतील, डायबिटीस होण्याचा धोकाही तेवढा कमी असेल. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हे फीचर जास्त मॅटर करतं. ज्या पुरूषांमध्ये पायांच्या तुलनेत धडाची लांबी अधिक होती, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका अधिक होता.

हृदयरोगांचा धोकाही अधिक

रिसर्चनुसार, उंच लोकांमध्ये लिव्हर फॅट कन्टेन्ट, कमी उंची असलेल्यांच्या तुलनेत कमी असतो. सोबतच कमी उंची असलेल्यांमध्ये उंच लोकांच्या तुलनेत इन्सुलिन रेजिस्टेंसही अधिक असतं आणि सोबतच यात फॅट जमा होण्याची प्रवृत्ती देखील अधिक असते. याचं कारण कमी उंची असलेल्यांचा कंबरेचा घेर उंच लोकांच्या तुलनेत अधिक असतो. कमी उंची असणाऱ्यांमध्ये डायबिटीस सोबतच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही अधिक असतो.


Web Title: People with short height are at greater risk of type 2 diabetes says research
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.