अनेकदा आपण बघतो की, काही लोकांना बसल्या ठिकाणी सतत पाय हलवण्याची सवय असते. तुम्हाला कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय आहे का? जर उत्तर हो असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा. कारण तुम्ही रेस्टलेस लेग सिंड्रोमने पीडित असू शकता. हा एका असा आजार आहे, ज्यात खासकरून सायंकाळी किंवा रात्री व्यक्तीचे पाय आकडणे, पायात वेदना होणे किंवा पायात झिणझिण्या येतात. हा त्रास होऊ नये म्हणून व्यक्तीला पाय हलवण्याची किंवा चालण्याची तीव्र इच्छा होते.
या आजाराबाबत ऐकल्यावर असं वाटतं की, या आजाराने व्यक्तीचं जास्त नुकसान होत नाही. मात्र, या आजाराने काही समस्या नक्कीच होतात. जसे की, झोप न येणे, झोपेत नस लागणे, बसताना त्रास होणे आणि उशीरापर्यंत एका जागेवर उभे न राहू शकणे, सोबत आत्महत्येचा धोका वाढणे अशा गंभीर समस्या होऊ शकतात.
आत्महत्येचा धोका अधिक
jamanetwork.com एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला असून यात या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या रिसर्चमधून समोर आले आहे की, ज्या लोकांना हा आजार असतो त्यांचा आत्महत्या किंवा स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. ही स्थिती रूग्णाला डिप्रेशन, स्ट्रेस, डायबिटीस किंवा झोप न येण्याची समस्या असेल तरिही निर्माण होऊ शकते.
कसा केला रिसर्च?
अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोमने पीडित साधारण २४ हजार १७९ रूग्ण आणि १४५, १९४ अशा लोकांचे मेडिकल रेकॉर्ड्स चेक केले गेले ज्यांना हा सिंड्रोम नव्हता. यातील कुणालाही आत्महत्या किंवा स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचे विचार येत नव्हते.
या लोकांचे मेडिकल रेकॉर्ड्स चेक केल्यावर समोर आले की, ज्या लोकांना हा सिंड्रोम होता, त्यांची आत्महत्या किंवा स्वत:ला नुकसान पोहोचवण्याची शक्यता हा सिंड्रोम नसलेल्यांच्या तुलनेत २७० टक्क्यांनी अधिक होती. अभ्यासकांना आढळलं की, डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर किंवा इतर आजारांसारखे फॅक्टर्स दूर केल्यावरही ही शक्यता कमी झाली नाही.
अभ्यासकांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांना आत्महत्या आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम यांच्यातील कनेक्शन मागचं कारण समजू शकलं नाही. त्यांनी जोर दिला की, यावर आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.