दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च 

By manali.bagul | Published: October 4, 2020 03:29 PM2020-10-04T15:29:32+5:302020-10-04T15:30:28+5:30

Health Tips & Research in Marathi : हेल्दियंस (Healthians )च्या रिपोर्टनुसार कॉलेस्ट्रॉलची वाढ होत असलेल्या लोकांमध्ये २२.३ टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे. 

People heart health improved in lockdown heart patients reduced study | दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च 

दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च 

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार  रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग एकाच ठिकाणी थांबल्याप्रमाणे भासत होते. अशा स्थितीत लोकांना घरी थांबण्याशिवाय पर्याय नव्हता परिणामी लोकांच्या जीवनशैलीत बराच बदल घडून आला. एका रिसर्चनुसार लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये हृदयाच्या विकारांचे प्रमाण कमी झाले आहे. हेल्दियंस (Healthians )च्या रिपोर्टनुसार कॉलेस्ट्रॉलची वाढ होत असलेल्या लोकांमध्ये २२.३ टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे. 

हा रिसर्च २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात आणि २०२९ त्या  शेवटच्या तीन महिन्यांत ५० हजारांपेक्षा जास्त लोकांवर  करण्यात आला होता.  या अभ्यासानंतर महिला आणि पुरूषांमधील आकडेवारीचे सखोल विश्लेषण करण्यात आले होते.  महिलांच्या तुलनेत जास्त वयाच्या पुरूषांच्या हृदयाच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली. हृदयासंबंधी समस्या असलेल्या महिलांमध्ये १७.२ टक्के तर पुरूषांमध्ये २५.५ टक्के कमतरता दिसून आली. या सकारात्मक बदलाचे कारण कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेले लॉकडाऊन मानलं जात आहे. 

योग्यप्रमाणात अन्नपदार्थाचे सेवन

या संशोधनात दिसून आलं की, लॉकडाऊनदरम्यान लोक जंक फूड, फास्ड फूड, तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करत होते.  तसंच खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतही बदल घडून आला त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या हृदयाचे आरोग्य सुधारले. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यामागे जंक फूडचं सेवन कमी करणं हे महत्वाचं कारण समजलं जात आहे. हेल्दीयंसच्यामते कॉलेस्ट्रेरॉलमुळे हार्मोन्स, व्हिटामीन डी, पेशी निरोगी राहतात. पण कॉलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे धमन्यांच्या भींतींवर एक थर जमा होतो. त्यामुळे हृदयावर ताण पडतो. अनेकदा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फॅटफूल, मैद्याच्या, तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करायला हवे. 

वयस्कर लोकांच्या प्रकृतीत सुधारणा

या अभ्यासातून एक महत्वपूर्ण बाब समोर आली ती म्हणजे २०, ३० आणि ४० वर्षातील लोकांच्या तुलनेत ५० आणि यावरील वयोगटातील लोकांमध्ये हृदयासंबंधी समस्याचे  प्रमाण कमी झालेले दिसून आले. याचं सगळ्यात मोठं कारण कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात असणं हे असल्याचे दिसून आले. 

मोठ्या शहरांमध्येही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 

डोरस्टेप हेल्थ सोल्यूशन प्रोव्हाईडरच्या रिपोर्टनुसार , अमृतसर, कानपुर आणि जालंधर या शहरात हृदयासंबंधी समस्यांमध्ये घट दिसून आली आहे. लहान शहरांमध्येही हृदयाच्या आजारांमध्ये कमतरता दिसून आली आहे. कारण जीवनशैलीत फरक असतो. शहरांच्या तुलनेत गावांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य  चांगले  राहते. 

Web Title: People heart health improved in lockdown heart patients reduced study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app