जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी
By Admin | Updated: March 11, 2016 00:27 IST2016-03-11T00:27:38+5:302016-03-11T00:27:38+5:30
जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी
ज गाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्हा रुग्णालयातील विविध वार्डांमध्ये सर्वेक्षण केले असता अनेक गंभीर व धक्कादायक बाबी समोर आल्या. आपतकालीन कक्षआपतकालीन कक्षात १४ खाटा आहेत. सर्वच खाटांवर रुग्ण होते. त्यातच एक गंभीर महिला उपचारांसंबंधी आली. तिला कुठल्या खाटेवर टाकावे हा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांसमोर होता. काही वेळ या महिलेला स्ट्रेचरवर तसेच ठेवण्यात आले. नंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला महिला कक्षात पाठविण्याचा निर्णय घेतला. आपतकालीन कक्षात पुरेशा खाटा नसल्याने अनेकदा रुग्णाला दाखल करून घेता येत नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनाही जागा नसते. ते वार्डातच खाटांवर बसलेले दिसले. महिला कक्षात दोन रुग्णांची हेळसांडनवीन इमारतीमध्ये प्रसूती व महिला कक्ष आहे. या कक्षात ३२ खाटा आहेत. सर्वच खाटांवर रुग्ण होत्या. त्यात दोन महिलांना खाटा नसल्याने त्यांना या कक्षानजीक लिफ्टसमोर बसविले होते. त्या विव्हळत होत्या. तशातच रुग्णांचे नातेवाईक व्हरांड्यात गर्दी करीत होते. सध्या उष्णता असल्याने रुग्णांचा त्रास अधिकच वाढल्याचे दिसून आले. पुरूष शल्य कक्षात दुर्गंधी, रिकाम्या खाटाजुन्या इमारतीमध्ये पुरुष शल्य कक्ष आहेत. यातील पहिल्या कक्षात तीन खाटा रिकाम्या दिसल्या. परंतु बेडशीट, पडदे स्वच्छ नसल्याने दुर्गंधी येत होती. दुसर्या कक्षातही चार खाटा रिकाम्या होत्या. कक्ष स्वच्छ होता. पण या कक्षातही दुर्गंधीचे वातावरण होते. रुग्णांचे नातेवाईक खाटांवर बसलेले दिसून आले. जनरल वार्डातही रिकाम्या खाटाखालच्या मजल्यावर जनरल वार्डात सात खाटा रिकाम्या होत्या. रुग्णांची हेळसांड होत नव्हती, परंतु अस्वच्छतेची समस्या या वार्डातही होती. काही सिस्टर उपचारासंबंधी राखीव कक्षात गप्पा मारत बसल्या होत्या. केस पेपर खिडकीवर गर्दीकेस पेपरसंबंधीच्या खिडकीवर प्रचंड गर्दी झाली होती. एक कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा केस पेपर काढण्यासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींना शांतता राखण्याचे आवाहन करीत होता. पण खिडकीसमोर लोटालोटी, रेटारेटी असा प्रकार सुरू होता. त्यात महिलांना अधिकचा त्रास होत असल्याचे दिसून आले.