शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लस घेतली, महिलेच्या हाडांना सूज आली... ऑक्सफर्डने सांगितलं चाचणी का थांबवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 18:29 IST

अ‍ॅक्स्ट्राजेनेकाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाची शारीरिक स्थितीत आता हळूहळू सुधारणा होत आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची चाचणी रोखण्यात आली आहे. कोरोनाच्या माहामारीत आशेचा किरण दाखवत असेलेल्या लसीची चाचणी थांबवण्याामुळे निराशा पसरली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅक्स्ट्राजेनका  मिळून ही लस तयार करण्याचं काम करत आहेत.  या चाचणीत इतर स्वयंसेवकांप्रमाणेच UK च्या महिलेचाही समावेश होता. लस दिल्यानंतर या महिलेच्या हाडांना सुज आली. असे परिणाम खूप कमी प्रमाणात लोकांमध्ये दिसून येतात. त्यामुळे कंपनीकडून  चाचणी रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.अ‍ॅक्स्ट्राजेनेकाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाची शारीरिक स्थितीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. लवकरच रुग्णालयातून घरी  सोडण्यात येणार आहे.

लसीची चाचणी थांबवण्याच्या एक दिवस आधीच अ‍ॅक्स्ट्राजेनेका आणि ८ औषधांच्या कंपन्यांनी लस शास्त्रिय आणि नैतिक तत्वांवार आधारित तयार केली जात असल्याचे सांगितले होते. लसीची चाचणी कधी सुरू होणार याबाबत  कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आता भारतातही या लसीचे ट्रायल रोखण्यात आलं आहे. याबाबत WHO च्या मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, कोविड-१९ च्या लसीचे पहिले आणि आवश्यक प्राधान्य ही त्याची सुरक्षितता हे असले पाहिजे. आम्ही लस लवकर आणण्याबाबत बोलत आहोत. मात्र त्याचा अर्थ तिच्या सुरक्षेत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जावी असा होत नाही. 

लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. कोरोनावरील लस विकसित करताना सर्व नियमांचे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची तपासणी होणे आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेली कोरोनाची लस घेणाऱ्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अमेरिकेत या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोखण्यात आल्या आहेत.

भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली

अ‍ॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला होता.  या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी १७ ठिकाणी सुरु आहे. पण डीसीजीआयनं नोटिस दिल्यानंतर सीरम इंस्टिट्यूटनं चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्याबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अमेरिकास ब्राजिल, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे.  ही लस सर्वात अ‍ॅडव्हान्स असल्याचा दावा केला जात होता. सर्वांनाच या लशीची प्रतीक्षा होती. आता ही लस उपलब्ध होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो असंही सांगितलं जात आहे.

हे पण वाचा-

चिंताजनक! भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....

CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या