CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:48 AM2020-09-10T11:48:29+5:302020-09-10T11:58:33+5:30

डॉक्टरांच्या वापरात असलेला सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

CoronaVirus : Coronavirus information mask advisory covid-19 | CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा कहर देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनापासून बचाव करणारी लस अजूनही उपलब्ध झालेली नाही. गंभीर आजारावर वापरात असेलल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी केला जात आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासासाठी आणि निरोगी राहण्यासाठी  मास्कचा वापर महत्वाचा आहे. लेडी हार्डींग  मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अर्पणा  अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क लावण्याच्या सवयीवर अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. कॉटनचा मास्क वापरल्यानं कोणतीही समस्या उद्भवत नाही. डॉक्टरांच्या वापरात असलेला सर्जिकल मास्क सामान्य लोकांनी वापरल्यास त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

सुरूवातीला लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका कमी असल्याचं दिसून आलं होतं.  त्यानंतरच्या संशोधनात लहान मुलांनाही व्हायरसच्या संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो हे दिसून आलं म्हणूनच  12 वर्षावरिल लहान मुलांना मास्क वापरणं गरजेचं आहे. त्याखालील वयोगटातील मुलांकडे विशेष लक्ष  देणं गरजेचं आहे. दिल्लीच्या रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा मास्क लावूनच निघायला हवं. 

एकदा मास्क वापरल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी त्याच मास्कचा वापर करू नका.  कापडाचा मास्क वापरत असाल तर तुम्ही धुवून त्याच मास्कचा वापर करू शकता.  खबरदारी म्हणून आपल्यासोबत नेहमी दोन मास्क ठेवा.  अर्धवट सुकलेला मास्क वापरू नका कारण त्यामुळे एलर्जी, खोकला, गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते. सर्जिकल मास्क असल्यास वापरल्यानंतर फेकून द्या. लक्षणं असल्यावरच होम क्वारंटाईन करायला हवं असं नाही. चुकून एखाद्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करायला हवं. संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवायला हवेत. किंवा संक्रमित रुग्णानं स्वतःच साफसफाई करून खबरदारी बाळगल्यास उत्तम ठरेल. 

देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 44 लाखांवर पोहोचली असून पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

मक्याच्या चमकदार धाग्याचे 'हे' फायदे वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

Web Title: CoronaVirus : Coronavirus information mask advisory covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.