चिंताजनक! भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 02:44 PM2020-09-10T14:44:52+5:302020-09-10T16:05:17+5:30

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ट्रायल तात्काळ थांबवले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DGCI चा पुढचा आदेश येईपर्यंत चाचण्या रोखल्या जाणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्त ही चाचणी रोखण्यात आली आहे.

अ‍ॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला होता. अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केलं होतं की, चाचणीत एक व्यत्यय आलं आहे, कारण चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीच्या वादावरून सीरम इंस्टीट्यूटला बुधवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसेमध्ये रुग्णांच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. नोटीस मिळाल्यानंतर काही तासांत या संस्थेनं एक निवेदन तयार केलं आहे.

DCGI ने मानवी चाचणी थांबवू नये असं कुठेही या नोटीसमध्ये नमूद केलेलं नाही. त्यामुळे आम्ही DCGI च्या सूचनांचं पालन करत आहोत. DCGI ला लशीच्या सुरक्षेबाबत काही समस्या असल्यास त्याचं निराकरण आणि DCGIच्या प्रोटोकॉलचं पालनही करू असं सीरमने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्राय १७ ठिकाणी सुरु आहे. पण डीसीजीआयनं नोटिस दिल्यानंतर सीरम इंस्टिट्यूटनं चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्याबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अमेरिकास ब्राजिल, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे.

ही लस सर्वात अॅडव्हान्स असल्याचा दावा केला जात होता. सर्वांनाच या लशीची प्रतीक्षा होती. आता ही लस उपलब्ध होण्यासाठी आणखीन बराच कालावधी लागू शकतो असंही सांगितलं जात आहे.

कोविड-19च्या लशीचे एक अब्ज डोसचं भारतात उत्पादन केलं जाणार होतं. त्यासाठीच भारतात मानवी चाचणी सुरू होती.

आता चाचणी रोखल्यानंतर पुन्हा कधी लसीच्या चाचणीला सुरूवात होणार याची प्रतिक्षा आहे.

दरम्यान भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे.