हिरड्यांमधून येणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; वाचा हिरड्या निरोगी ठेवण्याचा सोपा उपाय

By Manali.bagul | Published: February 6, 2021 05:10 PM2021-02-06T17:10:07+5:302021-02-06T17:28:45+5:30

Oral Health Tips in Marathi : जरी हिरड्यांतून रक्त बाहेर पडत असेल निरोगी राहण्यासाठी दात घासणे किंवा फ्लोसिंग करणे चांगले आहे.

Oral Health Tips: Add vitamin c to your diet to prevent bleeding gums problems | हिरड्यांमधून येणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; वाचा हिरड्या निरोगी ठेवण्याचा सोपा उपाय

हिरड्यांमधून येणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; वाचा हिरड्या निरोगी ठेवण्याचा सोपा उपाय

googlenewsNext

व्हिटॅमिन सी च्या अभावांमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव देखील होतो असे एका रिसर्चमध्ये दिसून आले आहे. नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन सर्वेक्षणातील आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना असे आढळले की रक्तातील  व्हिटॅमिन-सी पातळी कमी होते, त्यामुळे हिरड्यांचा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि रेटिनल रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त होती.

या अभ्यासाचे  लेखक आणि वॉशिंग्टन स्कूल ऑफ डेंटिस्ट्री येथील ओरल हेल्थ विज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक फिलिप ह्यूगल म्हणतात की, ''हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि रेटिना हेमोरेजिंग मायक्रोव्हास्क्युलरच्या समस्येस सूचित करते म्हणून अभ्यासाचे निकाल महत्त्वपूर्ण आहेत.  ही कार्यप्रणाली मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांसह शरीराच्या लहान रक्तवाहिन्यांभोवती असते.

व्हिटॅमिन-सी प्लाझ्माच्या पातळीकडे लक्ष देऊन आणि काही घटकांची कमतरता दूर केल्यामुळे सूक्ष्म रक्तस्त्रावची समस्या संपूर्ण शरीरात कमी होऊ शकते. जरी हिरड्यांतून रक्त बाहेर पडत असेल निरोगी राहण्यासाठी दात घासणे किंवा फ्लोसिंग करणे चांगले आहे. यासाठी आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

 लक्षणं

हिरड्यांच्या रक्तस्त्रावामुळे उद्भवत असलेल्या इतर लक्षणांमध्ये श्वासांचा घाणेरडा वास, सुस्तपणा, हिरड्यांना आलेली सूज, हिरड्या लाल किंवा जांभळ्या, सैल दात, तोंडाचा अल्सर यांचा समावेश आहे. त्याशिवाय हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याबरोबरच शरीरातील इतर प्रणालींशी संबंधित इतर लक्षणे देखील दिसू शकतात.

हाड आणि सांधेदुखी रक्ताच्या उलट्या, मानेतील मध्ये सूजलेल्या ग्रंथी (लिम्फॅडेनोपॅथी), भूक न लागणे, वजन कमी होणे, ताप, पाठदुखी, शरीराची कमकुवतपणा किंवा थकवा , झोपेच्या वेळी घाम येणे, नाकातून किंवा त्वचेतून रक्त येणे त्वचा पिवळसर होणे ही लक्षणं आहेत.

समस्या टाळण्यासाठी  कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी पुरेशा प्रमाणात आढळते. हिरड्यांमधून रक्तस्त्राव झाल्यास, एक वाटी संत्राचा रस एक चिमूटभर जिरे पावडर आणि अर्धा चमचा साखर घालून प्या. काही दिवस सतत सेवन केल्यास त्रास कमी होतो आणि हिरड्यांची जळजळ देखील कमी होते.

लिंबू

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सी असते जे हिरड्यासाठी चांगले असते. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. लिंबामध्ये आढळणारा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दात संसर्गास कारणीभूत ठरत नाही आणि एंटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे हिरड्यांना सूज आणत नाही. हिरड्यांना रक्तस्त्राव झाल्यास आपल्या आहारात लिंबू घाला. आपल्याला हवे असल्यास, कोशिंबीरमध्ये लिंबाचा रस घालून सेवन करणं फायद्याचे ठरेल. कमी वयात सांधेदुखी अन् हाडं खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात 'या' ५ गोष्टी, वेळीच जाणून घ्या

तोंडाच्या रोगांसाठी गाजर

पौष्टिक गाजरांमध्ये ए, डी, सी, बी 6 प्रथिने, सोडियम, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम इ. असते. गाजरचे औषधी गुणधर्म तोंडाच्या आजारांकरिता फायदेशीर ठरतात. गाजराची ताजी पाने चवल्याने हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो तेव्हा आराम मिळतो. या व्यतिरिक्त गाजरचा रस पिल्यास तोंडाचा अल्सर, हिरड्यांचा रक्तस्त्राव होण्यास आराम मिळतो. तुम्हाला माहीतही नसतील नारळ पाण्याचे  हे ७ दुष्परिणाम; डॉक्टरांनी सांगितली सेवनाची योग्य वेळ

आवळा

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आवळ्यामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन-सी असते. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याचे एक कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन-सीचा अभाव, ज्यामुळे हिरड्यांमध्ये सूज येणे आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने बॅक्टेरिया संक्रमणाशी लढण्याच्या गुणवत्ता वाढते आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते आणि शरीरातील व्हिटॅमिन-सी ची कमतरता दूर होते. 

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

Web Title: Oral Health Tips: Add vitamin c to your diet to prevent bleeding gums problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.