डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:16 IST2024-12-18T12:16:05+5:302024-12-18T12:16:45+5:30

Weak Eyesight : कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. तंमय गोस्वामी यांनी डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी उपाय सांगितला आहे.

One exercise that can treat weak eyesight and make vision sharp according to-ayurveda | डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

Weak Eyesight : वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे. याला आजकालची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असतात. जर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर डोळ्यांनी धुसर दिसू लागतं. अशात कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. तंमय गोस्वामी यांनी डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी उपाय सांगितला आहे.

जवळचं किंवा दूरचं स्पष्ट दिसण्यासाठी लोक चष्म्याची मदत घेतात. जर तुम्हालाही तुमचा चष्मा काढून टाकायचा असेल तर डॉक्टरांनी एक आयुर्वेदिक उपाय करण्याचा सल्ला दिला आहे. एक्सपर्ट म्हणाले की, डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्यासाठी एक पद्धत आहे. ती म्हणजे जेवण झाल्यावर डोळ्यांवर हात ठेवणं.

डोळे कमजोर झाल्याचे अनेक संकेत दिसतात. जसे की, धुसर दिसणे, अधेमधे स्पष्ट न दिसण्याची समस्या, लाइटच्या आजूबाजूला रंगीबेरंगी दिसणं, रात्री कमी दिसणं, डोळ्यातून पाणी येणं, डोळे दुखणं, लाल होणे इत्यादी.

डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा उपाय

डॉ. तंमय यांनी एका श्लोकाचा हवाला देत सांगितलं की, जेवण केल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासा. त्यानंतर दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. हातांची उष्णता डोळ्यांना द्या आणि असं दोन ते तीन वेळा करा. नियमितपणे ही क्रिया केल्याने डोळ्यांनी धुसर दिसण्याचा धोका कमी होतो. 

डोळे हेल्दी ठेवणारे फूड्स

गाजर, पालक, अंड्याचा पिवळा भाग यातून डोळ्यांना व्हिटॅमिन ए मिळतं. त्याशिवाय ब्रोकली, संत्री यातून व्हिटॅमिन सी मिळतं. इतर पोषक तत्व घेण्यासाठी बदाम, सूर्यफुलाच्या बीया, डार्क चॉकलेट, नट्स इत्यादीचं सेवन करावं.
 

Web Title: One exercise that can treat weak eyesight and make vision sharp according to-ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.