OMG : ‘या’ पाच कारणांनी ती देते नकार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 13:06 IST2017-04-12T07:36:15+5:302017-04-12T13:06:15+5:30
बऱ्याचदा एकाचीच मानसिक तयारी असते, मात्र दुसऱ्याची नसते. असेही आपल्याबाबतीत घडत असेल तर यामागे अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया...
.jpg)
OMG : ‘या’ पाच कारणांनी ती देते नकार !
सेक्स केल्याचे अनेक फायदे सांगितले जातात. त्यासाठी दोघांची मानसिक आणि शारीरिक तयारीही महत्त्वाची असते. बऱ्याचदा एकाचीच मानसिक तयारी असते, मात्र दुसऱ्याची नसते. ज्या व्यक्तीला सेक्स करणे फार आवडते तीच तुमच्याकडे दुर्लक्ष करु लागते. नेमके तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करीत नाही. असेही आपल्याबाबतीत घडत असेल तर यामागे अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला नकार देते.
ती जेव्हा रागावली असेल
बहुतांश महिला आपल्या जोडीदाराच्या चुकीच्या वागल्यामुळे राग व्यक्त करतात. या रागाचा परिणाम थेट बेडरुमपर्यंत होतो. त्याच्या चुकीच्या वागण्याने त्या कंटाळतात आणि सेक्सला नकार देतात. नकार देऊन त्या जणू तुम्हाला शिक्षाच देताय.
अहंकार दुखावणे
जसा पुरुषांना अहंकार म्हणजेच इगो असतो त्याच प्रमाणे स्त्रियांनाही फिमेल इगो असतो. त्यांचा इगो दुखावल्यावर त्या नक्कीच सेक्सला नकार देतात.
आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी
मुलांना जसे जोडीदाराला मागे धावायला लावणे आवडते तसे मुलींना आपल्या जोडीदाराला आपल्या हातातील खेळणे बनवायला आवडते. तिने जर तुम्हाला लवकरच जवळीक साधू दिली तर तुमचे तिच्याविषयीचे आकर्षण संपून जाईल असे तिला वाटते.
कमिटमेंट
स्त्रिया सहसा तेव्हाच तयार होतात जेव्हा त्यांना पुरुषाकडून कमिटमेंट मिळेल. जर तुम्ही तुमच्या नात्याच्या भविष्याविषयी तिला शाश्वती दिली नसेल तर तर ती कमिटमेंट मिळण्याची वाट पाहणे पसंत करेल.
कंटाळा
जर वरील कुठलेही कारण नसेल तर लक्षात घ्या की तिला तुमचा कंटाळा आला आहे. ती कदाचित दुसऱ्याविषयी विचार करत असेल