Belly Fat: आजकाल वजन वाढण्याची समस्या अनेकांना होत आहे. बऱ्याच लोकांचं पोट बाहेर आलेलं असतं. असेही काही लोक असतात ज्यांचं वजन तर कमी असतं, पण पोट बाहेर दिसतं. खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी नसल्यानं ही समस्या होते. अशात न्यूट्रिशनिस्टनं एका अशा खास ड्रिंकबाबत सांगितलं आहे जे ही समस्या दूर करू शकता. न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून एका खास ड्रिंकबाबत माहिती दिली. हे ड्रिंक पिऊ बाहेर निघालेलं पोट कमी करता येतं.
पोटावरील चरबी कमी करणारं ड्रिंक
हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी, एक चमचा जिरे, एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेपची गरज लागेल. ड्रिंक तयार करण्यासाठी या सगळ्या गोष्टी पाण्यात टाकून ५ मिनिटं उकडू द्या. चरबी कमी करणारं तुमचं ड्रिंक तयार आहे. हे ड्रिंक गाळून पिऊ शकता.
या ड्रिंकमधील जिऱ्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि पचनक्रिया सुधारते. धण्यामुळे वॉटर रिटेंशन कमी होतं. तर बडीशेपनं पचन चांगलं होतं आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते.
न्यूट्रिशनिस्टनं सांगितलं की, हे डिटॉक्स वॉटर प्यायल्यानंतर दिवसभरात १० हजार पावलं पायी चाला. यामुळे वजन वेगानं कमी होतं. सोबतच संतुलित आहार घेणंही महत्वाचं ठरतं.
हे ड्रिंक्सही पिऊ शकता
न्यूट्रिशनिस्टनं सांगितलं की, वरील ड्रिंकशिवाय तुम्ही इतरही काही ड्रिंक पिऊन पोटावरील चरबी कमी करू शकता. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात चिया सीड्सच्या पाण्यानं करू शकता. चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी सुद्धा पिऊ शकता. ओव्याचं पाणी शरीरात वाढलेली चरबी कमी करतं आणि त्यामुळे वजनही कमी होतं.
लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक मेथीच्या दाण्यांचं पाणी सुद्धा पिऊ शकता. फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असल्यानं या पाण्यानं पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
काकडीचं पाणी सुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. या पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.