शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Corona Testing: आता पेन्सिल करणार कोरोनाची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:34 IST

सध्या कोरोना लढ्यात लसीकरण हे जरी महत्त्वाचे शस्त्र असले, तरी कोरोना रुग्णाची ओळख पटून त्याला तातडीने विलगीकरणात ठेवून, त्याच्यावर उपचार सुरू होणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जगभरात कोरोनाच्या चाचण्यांसाठी अनेक मार्गांचा वापर केला जात आहे

जगाच्या राशीला लागलेला कोरोना लवकर पाठ सोडण्याची काही चिन्हं नाहीत; मात्र आपण आता कोरोनाच्या बाबतीत पूर्वी येवढे अनभिज्ञ राहिलेलो नाही, हेदेखील महत्त्वाचे. कोरोनाशी लढताना अंतरभानाबरोबरच  स्वच्छता, चाचण्या आणि लसीकरण यांचे महत्त्व देखील आपल्या लक्षात येऊन चुकले आहे.

सध्या कोरोना लढ्यात लसीकरण हे जरी महत्त्वाचे शस्त्र असले, तरी कोरोना रुग्णाची ओळख पटून त्याला तातडीने विलगीकरणात ठेवून, त्याच्यावर उपचार सुरू होणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जगभरात कोरोनाच्या चाचण्यांसाठी अनेक मार्गांचा वापर केला जात आहे; मात्र या सर्व चाचण्या वेळखाऊ, महाग आणि तज्ज्ञ लोकांच्या देखरेखीखालीच करण्याची गरज असणाऱ्या आहेत. अशावेळी अत्यंत सुलभ, वेगाने निदान करणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणाऱ्या चाचण्यांची गरज लक्षात घेता, देश-विदेशातील शास्त्रज्ञ अशा चाचण्यांसाठी प्रयत्नशील आहेत. 

अमेरिकन शास्त्रज्ञांनी पेन्सिलीच्या मदतीने कोरोनाची चाचणी करण्याची अभिनव आणि खात्रीशीर पद्धत शोधून काढली आहे. या चाचणीच्या मदतीने अवघ्या सात मिनिटात कोरोनाचे अचूक निदान करणे शक्य असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही चाचणी पद्धत शोधून काढली असून, सध्या उपलब्ध असलेल्या सर्व चाचण्यांपेक्षा, ही ग्राफाईटच्या  मदतीने केली जाणारी चाचणी अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार असून, तिची किंमत भारतीय चलनात शंभर रुपये येवढी खाली आणणे शक्य होणार आहे. या चाचणीचे नाव ‘लिड’  Low-cost Electrochemical Advanced Diagnostic (LEAD) ठेवण्यात आले आहे.

या चाचणीत पेन्सिलमधील ग्राफाईटच्या काडीला इलेक्ट्रोडसारखे वापरण्यात येते. त्यानंतर या ग्राफाईट इलेक्ट्रोडला मानवी लाळ अथवा कोरोना चाचणीसाठी नाकातून घेतलेल्या सॅम्पल आणि human angiotensin-converting enzyme 2 बरोबर ठेवले जाते. त्यानंतर ग्राफाईट इलेक्ट्रोडला केमिकल सिग्नलला जोडून चाचणी केली जाते. चाचणीमध्ये या केमिकल सिग्नलद्वारे रुग्ण कोरोनाबाधित आहे का कोरोनामुक्त आहे, याची माहिती मिळवली जाते. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार या चाचणीमध्ये नमुना म्हणून मानवी लस वापरण्यात आली, तेव्हा १००% अचूक निदान प्राप्त झाले. तर नाकातील नमुना घेतल्यानंतर यशाचा आकडा ८८% अचुकतेपर्यंत पोचला. मुख्य म्हणजे ही चाचणी सामान्य माणूस कोणत्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय स्वत:च करू शकणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या