शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:51 IST

केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतात साठणारी चरबी (लिव्हर फॅट) ही गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते, असा इशारा इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

तेल अवीव : केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतात साठणारी चरबी (लिव्हर फॅट) ही गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते, असा इशारा इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे. तेल अवीव विद्यापीठ व ‘डाना ड्वेक चिल्ड्रन्स हॉस्पिटल’ यांनी केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, ज्यांच्या यकृतात चरबीचे प्रमाण जास्त आहे, अशा मुलांना पुढे जाऊन टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लिव्हर सिरोसिससारख्या आजारांचा धोका अधिक असतो.अभ्यासात ३१ लठ्ठ मुलांची तपासणी करण्यात आली. आजारांचे लक्षण दिसलेल्या मुलांच्या यकृतात सरासरी १४ टक्के चरबी आढळली, तर निरोगी मुलांमध्ये ती फक्त ६ टक्के होती. विशेष म्हणजे, दोन्ही गटांमध्ये आंतरिक चरबी (विसरल फॅट) किंवा इतर घटक समान होते; मात्र फरक केवळ यकृतातील चरबीच्या प्रमाणात फरक दिसून आला. संशोधन पथकाने एमआरआय स्कॅनद्वारे वेदनारहित पद्धतीने हे मोजमाप केले.

मुख्य धोका : मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सिरोसिसकारणीभूत घटक : अति सोडियम, प्रोसेस्ड फूड, संतृप्त चरबी  

आहाराची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता> या निष्कर्षातून असे समोर आले की फक्त वजन कमी करणे पुरेसे नाही, तर आहारातील गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे.> आजारांची लक्षणे असलेल्या मुलांमध्ये सोडियम, प्रोसेस्ड फूड व संतृप्त चरबीचे सेवन अधिक असल्याचे आढळले.> तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, मासे, ऑलिव्ह तेल व सुका मेवा यांचा समावेश करणे अधिक आरोग्यदायी ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Childhood Liver Fat: Not Just Obesity, Invites Serious Diseases

Web Summary : Israeli scientists warn that liver fat in children, not just obesity, can lead to type-2 diabetes, high blood pressure, heart disease, and liver cirrhosis. A study highlights the need for improved diet quality, focusing on reducing sodium, processed foods, and saturated fats, while increasing fruits, vegetables, and whole grains.
टॅग्स :Healthआरोग्य