शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
4
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
5
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
6
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
7
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
8
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
9
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
10
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
11
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
12
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
13
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
14
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
15
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
16
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
17
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
18
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
19
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
20
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश

ब्रेन ट्युमर ऐकलं तरी भीती वाटते, पण प्रत्येक ब्रेन ट्युमर हा कॅन्सर नसतो, गैरसमजांमधून बाहेर पडूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:22 IST

Brain Tumor : ब्रेन ट्युमर म्हणजे पेशींचा एक असा समूह जो मेंदूमध्ये किंवा त्याच्या जवळपास अयोग्य, शरीराला हानिकारक वर्तन करत असतो. डॉक्टर्स त्यांचे वर्गीकरण दोन प्रकारे करतात.

(डॉ अभिजित कुलकर्णी, कन्सल्टन्ट, न्यूरोसर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई)

Brain Tumor : ब्रेन ट्युमर हा शब्द नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. हा आजार म्हणजे जीवघेणा हे समीकरण जवळपास प्रत्येकाच्या मनात पक्के असते.  न्यूरोसर्जन म्हणून प्रॅक्टिस करताना मी प्रत्येक वेळी सांगत असतो की, प्रत्येक ब्रेन ट्युमर हा जीवघेणा नसतो, उपचारांमधून चांगले परिणाम हाती लागण्याची आशा अनेक रुग्णांच्या बाबतीत असते.

ब्रेन ट्युमर म्हणजे काय 

ब्रेन ट्युमर म्हणजे पेशींचा एक असा समूह जो मेंदूमध्ये किंवा त्याच्या जवळपास अयोग्य, शरीराला हानिकारक वर्तन करत असतो. डॉक्टर्स त्यांचे वर्गीकरण दोन प्रकारे करतात - 

सौम्य ट्युमर - हे कॅन्सर नसतात, खूप धीम्या गतीने वाढतात आणि डोक्याच्या कवटीपाशी थांबतात. मेनिन्जिओमास, पिट्यूटरी एडेनोमास आणि अकॉस्टिक न्यूरोमास हे या वर्गातील आहेत. बहुतेक केसेसमध्ये सर्जन त्यांना पूर्णपणे काढून टाकतात आणि रुग्ण त्यातून बरे होतात.

घातक ट्युमर - हे कॅन्सरस असतात, मेंदूच्या पेशींमध्ये पसरतात आणि त्यांच्यावर अतिशय तातडीने उपचार करणे खूप गरजेचे असते. ग्लिओब्लास्टोमा हे हेडलाइन ऍक्ट बऱ्याच लोकांना माहिती असते. थेरपीमध्ये स्केलपेल, बीम आणि औषधे या सर्वांचा समावेश करावा लागतो. नशीब, संशोधन आणि धैर्याच्या बळावर, अनेक रुग्णांना धक्का बसण्याआधी बरीच वर्षे मिळतात.

ब्रेन ट्युमरबद्दलच्या सामान्य गैरसमजांना दूर करूया 

गैरसमज १: सर्व ब्रेन ट्युमर जीवघेणे असतात. 

सत्य: डोक्याच्या कवटीच्या आतील बरेच ट्युमर जीवघेणे नसतात. अनेक सौम्य ट्युमरवर सहजपणे उपचार करता येतात किंवा त्यांना नियंत्रणात ठेवता येते. काही घातक प्रकारचे ट्युमर देखील हळूहळू वाढतात आणि बरीच वर्षे नियंत्रणात ठेवता येतात. 

गैरसमज २: ब्रेन सर्जरी म्हणजे भीतीदायक, गंभीर. 

सत्य: नवीन तंत्रज्ञान न्यूरोनेव्हिगेशन, इंट्रा-ऑप एमआरआय, छोट्या कीहोलइतक्या आकाराच्या चिरा अशा प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व प्रक्रिया अतिशय अचूकपणे आणि यशस्वीपणे करता येते. कुशल टीम्स सर्व धोक्यांवर बारकाईने लक्ष ठेवतात, काही बदल करणे आवश्यक असेल तर तातडीने करतात, जास्तीत जास्त सुरक्षा बाळगतात. 

गैरसमज ३: लक्षणे खूप मोठी आणि गंभीर असतात. 

सत्य: आकडी येणे, बेशुद्ध पडणे यासारखी लक्षणे तर असतातच, पण बऱ्याच ट्युमरच्या बाबतीत सौम्य डोकेदुखी, अस्पष्ट दृष्टी, मूडमध्ये अचानक बदल होणे किंवा नीट चालता न येणे अशीच लक्षणे असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाणे किंवा इतर काहीतरी त्रासामुळे असतील असा गैरसमज होणे सहजशक्य असते, पण खरेतर तातडीने डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते.

आजाराचे निदान लवकरात लवकर केल्याने जीव वाचवणे शक्य असते. भीतीमुळे किंवा निव्वळ गैरसमजामुळे अनेक लोक डॉक्टरकडे जाणे चक्क टाळतात. सततची डोकेदुखी, अस्पष्ट दृष्टी, बोलताना त्रास होणे किंवा अचानक खूप थकवा येणे असे किंवा यापैकी काहीही त्रास होत असतील तर तातडीने तपासणी करून घेतली पाहिजे. एमआरआय किंवा सीटी स्कॅनमध्ये बऱ्याच गोष्टी समजून येऊ शकतात.

उपचारांमध्ये संपूर्ण टीमचे सहकार्य आवश्यक असते. 

मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये देखभाल अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरु होते आणि उपचारही खूप वेगाने केले जातात. न्यूरोसर्जन, न्यूरॉलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट आणि रिहॅब स्पेशालिस्ट एकत्र येऊन उपचार योजना तयार करतात. या टीमवर्कमुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागण्याचा कालावधी कमी होतो, रिकव्हरी लवकरात लवकर होते, रुग्णाच्या कुटुंबाला निश्चिन्त राहता येते.

भीती बाळगण्याऐवजी सत्य समजून घ्या. 

ब्रेन ट्युमर हे ऐकायला जरी भीतीदायक असले तरी चिंता करून काही उपयोग नसतो. आधुनिक साधने, तंत्रज्ञान, सुस्पष्ट माहिती आणि उत्तम साहाय्य यामुळे अनेक रुग्णांना आजारातून बरे होऊन शाळा, ऑफिस, खेळ यांच्याकडे परतणे सहजशक्य आहे. 

लक्षात ठेवा: ब्रेन ट्युमरचे निदान झाले म्हणजे जन्मठेप नव्हे. यावर उपचार करता येतात, ब्रेन ट्युमरमुळे आयुष्य कायमचे थांबले असे प्रत्येकवेळी होत नाही. सत्य, सुस्पष्ट माहिती पसरवूया, भीतीच्या ऐवजी आशा निर्माण करू या आणि प्रत्येक रुग्णासोबत ठामपणे उभे राहूया.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स