शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

न्यू इयर रिझोल्युशन म्हणून जोडप्याने घटवले तब्बल १८१ किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 12:07 PM

अव्वाच्या सव्वा वाढलेलं वजन त्या दोघांनी आपल्या बाळासाठी नववर्षाच्या संकल्पानिमित्त कमी केलं.

ठळक मुद्देदोघांचं वजन दिवसेंदिवस वाढत असल्याने ते अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरत होते. याला कंटाळून त्यांनी २०१६ च्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा संकल्प केला. याचा परिणाम म्हणून दोन वर्षात या जोडप्याने मिळून १८१ किलो वजन कमी केलं. 

इंडोनेशिया : तुमचा २०१८ वर्षाचा नविन संकल्प ठरला का? २०१७ ला केलेला संकल्प पूर्ण झाला का? तुम्ही म्हणाल संकल्प हे फक्त नविन वर्षाला करण्यासाठी असतात. ते मुळीच पूर्ण करण्यासाठी नसतात. १ जानेवारीला केलेले संकल्प कुणी वर्षभरात पूर्ण करत नाहीत. संकल्प पूर्ण करणारे अपवादानेच सापडतात. असाच दोन सुंदर अपवाद आहेत इंडोनेशियात. या जोडप्याने मिळून तब्बल १८१ किलो वजन कमी केलंय. तुम्ही म्हणाल ठिके, यात एवढं काय इंटरेस्टिंग आहे? पण त्यांनी ज्याप्रकारे वजन कमी केलंय ते नक्कीच थक्क करणारं आहे. 

मिरर यु.केने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचं नाव आहे लॅक्सी रीड आणि डेनी रीड. या दोघांचं २०१५ साली लग्न झालं. सुरुवातीपासूनच दोघंही अत्यंत स्थूल होते. लॅक्सीचं वजन २२० किलो आणि डेनीचं वजन १२७ किलो होतं. त्यांचं वजन दिवसेंदिवस वाढत जात होतं. त्यामुळे अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरत होते. तसंच वजनामुळे त्यांना मुल होण्यासही अडचण येत होती. याला कंटाळून त्यांनी २०१६ च्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा संकल्प केला. हा संकल्प त्यांनी तब्बल दोन वर्ष पाळला. त्याचा चांगला परिणाम दिसायचा तो दिसलाच. दोन वर्षात या जोडप्याने मिळून १८१ किलो वजन कमी केलं. 

इन्स्टाग्रामवर लॅक्सीने याबाबत माहिती दिलीय. त्यांनी वजन कमी करण्याचा पूर्ण प्रवास इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असा कॅप्शन दिलाय की, आम्ही कोणताही डाएट प्लॅन नव्हता केला, तसंच कोणताही जिम ट्रेनर ठेवला नाही किंवा कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केलेली नाही. आम्ही फक्त रोज जिम करत होतो. जिममुळेच आम्ही दोन वर्षात वजन कमी केलंय, असं तिनं म्हटलं आहे.

त्या दोघांनीही आता आई-बाबा होण्याचे वेध लागले आहेत. पालक म्हणून त्यांना सुदृढ राहायचं आहे. म्हणूनच त्यांनी हे जिमींग पुढेही सुरुच ठेवलंय. त्यांनी त्यांची कहानी इन्स्टाग्रामवर अपलोड केली तेव्हा त्यांना अनेकांनी शभेच्छा दिल्या. त्यांचं अनेकांनी कौतुकही केलं आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. लॅक्सीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तब्बल ५ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. आपण एखादा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत करायला हवी. तरच संकल्प पूर्ण होतो. या जोडप्याने त्यांच्या वागण्यातून सगळ्यांना असाच संदेश दिलाय. एवढंच नव्हे, तर केवळ संकल्प पूर्ण करायचाय म्हणून मेहनत न करता या संकल्पाचा आपल्या आयुष्यात काहीतरी उपयोग होईल हेही प्रत्येकाने पाहिलं पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय