(Image Credit : economictimes.indiatimes.com)
पॅन्क्रियाटिक कॅन्सर म्हणजेच स्वादुपिंडाचा कर्करोगावर ठोस असा कोणताही उपचार उपयोगी पडत नाही. एकदा का या कॅन्सरचं निदान झालं तर रूग्णाला हे कळून चुकलेलं असतं की, आता त्याच्याकडे फार जास्त वेळ नाही. इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो व रुग्ण त्या मानाने लवकर दगावतो. पाच वर्षात रूग्ण दगावतो. मात्र, आता एका रिसर्चमधून आशेची किरण दिसू लागली आहे.
एका नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये एका अशा टेक्निकचा शोध लावण्यात आला ज्याने या कॅन्सरच्या सेल्स आपोआप नष्ट होऊ लागतात. हा रिसर्च Oncotarget मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या टेक्निक परिक्षणाच्या १ महिन्याच्या आतच ट्यूमरमध्ये वाढलेल्या सेल्स म्हणजेच पेशी ९० टक्के कमी झाल्याचं आढळून आलं.
या रिसर्चमध्ये छोट्या मोलेक्यूल म्हणजेच रेणूमुळे कॅन्सरच्या सेल्स नष्ट होतात असं सांगण्यात आलं आहे. यासाठी फार जास्त कालावधीही लागत नाही. याचा प्रयोग एका उंदरावर करण्यात आला. कॅन्सर सेल्सने प्रभावित उंदरांवर उपचार करण्यासाठी PJ34 नावाचं मोलेक्यूल(रेणू- एकप्रकारचं मिश्रित औषध) परिक्षण करण्यात आलं. यात सेल्सचं जाळं भेदण्याची क्षमता आहे आणि याने मानवी शरीरातील कॅन्सर पेशींवर सक्षम प्रहार केला जातो.
या मोलेक्यूलने मानवी कॅन्सर पेशींची वाढ रोखली जाते आणि त्यांना विकसित होण्याची आवश्यक तत्व मिळू देत नाही. ज्यामुळे कॅन्सर पेशी वेगाने नष्ट होऊ लागतात. एका महिन्यात १४ दिवस लागोपाठ इंजेक्ट केल्यानंतर PJ34 या मोलेक्यूलने ट्यूमरमधील ९० टक्के पेशी पूर्णपणे नष्ट केल्या. एका दुसऱ्या उंदरावरील उपचाराचे निष्कर्ष पाहून डॉक्टर हैराण झाले. कारण त्या उंदरातील १०० टक्के कॅन्सर पेशी नष्ट झाल्या.
या रिसर्चनंतर अभ्यासकांसाठी आणखी एक आनंदाची बाब ही राहिली की, या कॅन्सरवर अशाप्रकारे उपचार करताना उंदराच्या शारीरिक स्ट्रक्चर, वजन आणि व्यवहारात काहीच बदल दिसला नाही. आता अभ्यासक यावर आणखी अभ्यास करून मनुष्यांवर हा उपचार कसा करता येईल याचा शोध घेत आहेत.
स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे
पोटाच्या वरच्या भागात दुखणे व दुखणे पाठीत पसरणे.
भूक न लागण
वजन कमी होणे
नैराश्य जाणवणे
स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कारणे
आपल्या स्वादुपिंडाच्या पेशींमध्ये जनुकीय बदल होऊन नॉर्मल पेशींचा मृत्यू होतो. स्वादुपिंडाचा कर्करोग हा स्वादुपिंडाच्या नलिकेपासून होतो. धुम्रपान, लठ्ठपणा यामुळे हा कॅन्सर होऊ शकतो. स्वादुपिंड झालेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांनाही होऊ शकतो. हा कॅन्सर पुरुषांना जास्त प्रमाणात. श्वेतवर्णीय व्यक्तींना हा कॅन्सर कमी प्रमाणात होतो.