नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:28 IST2025-04-15T13:27:58+5:302025-04-15T13:28:19+5:30

मागील  संशोधनांमध्ये ९९.९% पेक्षा जास्त लोकांमध्ये AnWj अँटीजेन आहे, असे आढळले होते. परंतू १९७२ च्या रुग्णाच्या रक्तात ते नव्हते.

New blood group type discovered! In 1972, a woman had a blood deficiency, and had been searching for it for the past 20 years... | नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...

नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...

एखाद्या गोष्टीच्या शोधासाठी किती वर्षे खर्ची घालावीत? 5, 10, 15...ब्रिटन आणि इस्रायलच्या संशोधकांनी तब्बल २० वर्षे घालवत एका नव्या रक्तगटाचा शोध लावला आहे. १९७२ मध्ये हा रक्तगट सापडला होता. संशोधक एका महिलेच्या रक्तात सापडलेली कमतरता शोधत होते. आता त्यांचा शोध प्रकाशित झाला असून यामुळे अशाप्रकारच्या दुर्मिळ रक्त गटाच्या लोकांवर चांगला उपचार करता येणे शक्य होणार आहे. 

या महिलेच्या रक्तात सापडलेल्या विशेषतेवर जवळपास २० वर्षे संशोधन करण्यात आले. आपल्या रक्तात अनेक प्रकारचे रक्तगट असतात, त्यापैकी ABO आणि Rh हे मुख्य घटक असतात. हे रक्तगट रक्तपेशींमध्ये आढळणाऱ्या प्रथिने आणि साखरेपासून बनलेले असतात. आपले शरीर रोग ओळखण्यासाठी त्यांचा वापर करते.

यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिस हेमॅटोलॉजिस्ट लुईस टिली यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये याची माहिती दिली होती. रक्त चढविताना रक्तगट जुळवणे खूप महत्वाचे आहे. रक्तगट जुळत नसेल तर गंभीर बाबी घडू शकतात. नवीन रक्तगटाच्या शोधाने अशा प्रकारच्या दुर्मिळ रक्तगटाच्या लोकांवर उपचार करणे सोईचे जाणार आहे, असे ते म्हणाले होते. 

मागील  संशोधनांमध्ये ९९.९% पेक्षा जास्त लोकांमध्ये AnWj अँटीजेन आहे, असे आढळले होते. परंतू १९७२ च्या रुग्णाच्या रक्तात ते नव्हते. हे अँटिजेन मायलिन आणि लिम्फोसाईट प्रथिनांवर आढळते. यामुळे संशोधकांनी या नव्या रक्तगटाला MAL असे नाव दिले. या रुग्णांमध्ये AnWj-निगेटिव्ह असते. टील यांना असे तीन रुग्ण सापडले होते. 

MAL हे काही काही गुणधर्मांसह एक अतिशय लहान प्रथिन आहे. यामुळे ते ओळखणे कठीण आहे. रक्तगट प्रणाली स्थापित करण्यासाठी आवश्यक पुरावे हवे होते, यासाठी आम्हाला एवढा वेळ लागला, असे इंग्लंडच्या वेस्ट विद्यापीठातील पेशी जीवशास्त्रज्ञ टिम सेटचेवेल यांनी सांगितले. नवजात मुलांमध्ये AnWj अँटीजेन नसते, परंतू जन्मताच ते निर्माण होते. यावर अजुनही शोध सुरु राहणार आहे. 

Web Title: New blood group type discovered! In 1972, a woman had a blood deficiency, and had been searching for it for the past 20 years...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.