(Image Credit : emedicinehealth.com)

दातांमध्ये होणारी किडीची समस्या जगभरातील लोकांना नेहमीच होत असते. ही समस्या अशी असते की, यावर जर वेळीच उपाय केले गेले नाही तर दातांमध्ये वेदना होतात आणि तोंडात इन्फेक्शनचाही धोका असतो. इतकेच नाही तर दात नेहमीसाठी डॅमेजही होऊ शकतात. अशात वैज्ञानिकांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. वैज्ञानिकांनी एक असं प्रोटीन शोधलं आहे ज्याने किड लागण्याची समस्या दूर होईल.

प्रोटीनच्या मदतीने दूर करा किड

(Image Credit : Social Media)

हे एक असं प्रोटीन आहे ज्याने दातांवर एक थर चढवला जातो आणि अशाप्रकारे दातांमधील किड दूर करण्यासोबतच पुन्हा कधीही किड लागणार नाही याची काळजी घेतली जाते. या नव्या प्रोटीनच्या मदतीने एक असं अ‍ॅडव्हान्स जेल तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्याला सहजपणे दातांवर लावता येईल. आणि याच्या वापराने दातांमध्ये होणारी किड दूर होईल.

उपचार न केल्यास इन्फेक्शनचा धोका

(Image Credit : thejamesclinic.com)

युनिव्हर्सिटी ऑफ हॉन्ग कॉन्गच्या वैज्ञानिकांनुसार, दातांमध्ये होणारी किड हा जगभरात होणाऱ्या सर्वात जास्त समस्यांपैकी एक आहे. डेंटिस्टकडे जाऊन किड ड्रिल करणे आणि नंतर दातांमध्ये काही भरून घेणे ही पूर्ण प्रक्रिया वेदनादायक असते. सोबतच जर किडीवर वेळीच उपाय केला नाही तर दातांमध्ये वेदना, इन्फेक्शन आणि अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नाही तर याने जीवालाही धोका होऊ शकतो.

कसं काम करेल प्रोटीन?

हा नवा रिसर्च एसीएस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आहे. ज्यात वैज्ञानिकांनी एक खासप्रकारचं प्रोटीन विकसित केल. हे प्रोटीन दातांच्या मुळात बॅक्टेरियामुळे जमा होणाऱ्या प्लाकने दातांची मूळं खराब होतात. अशात H5 नावाचं छोटं प्रोटीन डेव्हलप करण्यात आलंय, जे अ‍ॅंटी-कॅविटी कोटींगप्रमाणे काम करतं. हे व्यक्तीच्या सलाइवा ग्लॅंडमधून उत्पन्न होतं.


Web Title: New and novel protein will protect tooth from decay and cavities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.