मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 17:05 IST2021-03-05T16:58:33+5:302021-03-05T17:05:05+5:30
डॉक्टरने जेव्हा मुलाच्या नाकात इंडोस्कोप आणि ट्यूब कॅमेरा लावून पाहिलं तर त्यांना आढळलं की, त्याच्या नाकात टरबिनेट हायपरट्रॉफी (Terbinate Hypertrophy) नावाची समस्या झाली आहे.

मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!
एका लहान मुलाच्या नाकात बंदुकीची गोळी ८ वर्षे अडकून राहिली. त्याला कोणताही गंध येत नव्हता. जेव्हा त्याच्या नाकातून दुर्गंधी येणारं द्रव्य बाहेर आलं तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं तर ते हैराण झाले. मुलगा जेव्हा १५ वर्षांचा झाला तेव्हा पहिल्यांदा या अडचणीमुळे डॉक्टरकडे गेला होता. या घटनेचा रिपोर्ट Jama ओटोलॅरिंजोलॉजी-हेड अॅन्ड नेक सर्जरी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
डॉक्टरने जेव्हा मुलाच्या नाकात इंडोस्कोप आणि ट्यूब कॅमेरा लावून पाहिलं तर त्यांना आढळलं की, त्याच्या नाकात टरबिनेट हायपरट्रॉफी (Terbinate Hypertrophy) नावाची समस्या झाली आहे. म्हणजे नाकात टरबिनेट्स नावाच्या जागेवर सूज आली आहे. ही समस्या सामान्यपणे वातावरण बदलामुळे किंवा सायनसमुळे होते. या टेस्टनंतर डॉक्टरांनी मुलाला एक स्प्रे आणि एंटीहिस्टामिन औषध दिलं. आणि त्याला ४ ते ६ आठवड्यांनी पुन्हा यायला सांगितलं.
पण हा मुलगा एक वर्ष उपचारासाठी आलाच नाही. १६ वर्षांचा होईपर्यंत तो नाकाच्या या समस्येसोबतच जगत राहिला. त्याच्या नाकातून दुर्गंधी येणारा पदार्थ निघत राहिला. त्याला या पदार्थामुळे लाज वाटत होती. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं तर दिसलं की, त्याच्या नाकाच्या कॅविटीमध्ये ९ एमएम गोलाकार संरचना आहे. हे काहीतरी बाहेरील तत्व आहे. त्यानंतर त्याच्या नाकाची सर्जरी करण्यात आली. त्याच्या नाकातून मेटली बीबी पॅलेट बाहेर आली. मुलाच्या परिवारासोबत केलेल्या बोलण्यातून समोर आलं की जेव्हा तो वर्षांचा होता तेव्हा त्याला बंदुकीची गोळी लागली होती. त्यावेळी असं कोणतंही लक्षण समोर आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना सांगितलं नाही.
(Image Credit : Getty)
यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचा मेडिकल स्टुडंट डायलन जेड. इरविन म्हणाला की, बाहेरील तत्व कधी कधी नाकातून दुर्गंधी येण्याचं कारण ठरू शकतात. कारण ते नाकातून येणाऱ्या फ्लूइडचा नैसर्गिक रस्ता रोखतात. ज्यामुळे म्यूकसमध्ये बॅक्टेरीया वाढतो. यातून फार दुर्गंधी येते.
या मुलाच्या केसमध्ये गोळी स्पॉट करणं फार अवघड होतं. कारण वेळेनुसार पॅलेट पूर्णपणे नव्या टिश्यूने वेढला होता. डॉक्टरांनी गोळी बघण्यासाठी आधी टिश्यूज ऑपरेशन करून काढले. तेव्हा गोळीबाबत ठोस माहिती मिळाली. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, लहान वयात अशा गोळ्या लागणं सामान्य आहे. पण ही केस फार वेगळी होती. कारण यात मुलासोबत घटना अनेक वर्षाआधी घडली होती. त्याच्या नाकात इजा झाल्याची काही लक्षणेही नव्हते.