शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला मुकणार? हिटमॅनने दिले दुखापतीचे अपडेट्स 
2
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : गड आला...! आयर्लंडवर विजय पण, दुखापतीमुळे रोहित शर्मा retired hurt
3
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम 
4
इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती
5
जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान
6
पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली
7
NDAच्या बैठकीत काय झालं? नितीश कुमार, चंद्राबाबू यांची भूमिका काय?; CM शिंदेंनी दिली माहिती
8
देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!
9
"अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही"; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर 
10
तबेल्यात दफन लेकीचा मृतदेह, वडिलांना माहिती असूनही गप्प; १ महिन्यानं उलगडलं रहस्य
11
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 
12
मोदी कोणाची साथ घेतायत? नायडूंनीच २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला, नितीशकुमारांचा वाद तर एवढे की...
13
केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
14
मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?
15
निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
16
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
17
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
18
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
19
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
20
एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...

पावसाळ्यात या कारणांनी कानात इन्फेक्शनचा असतो धोका, जाणून घ्या लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:47 AM

Ear infection : शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. असाच एक अवयव म्हणजे कान. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. अशात जास्त लोकांना याबाबत माहितही नसतं. 

Ear infection : नुकताच पावसाळा सुरू झाला. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, पावसाळ्यातच वेगवेगळे आजारही होतात. त्यातील एक मोठी समस्या म्हणजे कानात फंगल, बॅक्टेरिअल आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका. या दिवसात फंगल आणि बॅक्टेरिया सहजपणे वाढतात. अशात शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. असाच एक अवयव म्हणजे कान. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. अशात जास्त लोकांना याबाबत माहितही नसतं. 

कानात इन्फेक्शन होण्याचं कारण....

कानात इन्फेक्शन होण्याची कारणे वेगवेगळी असतात. इन्फेक्शन कानाच्या वरच्या भागातही होतं आणि कानाच्या आतही होतं. काही कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील.

1) पावसात भिजल्याने - पावसात भिजण्याचे नुकसानही खूप आहेत. पावसात भिजल्याने कानात इन्फेक्शन हे व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. खासकरून बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया किंवा हिमोफिलस इनफ्लुएंजा. हे सामान्यपणे तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या ब्लॉकेजमुळे होतं. ज्यामुळे कानात एक द्रव्य तयार होतं. यूस्टेशियन ट्यूब एक छोटी ट्यूब असते जी तुमच्या कानापासून थेट गळ्यापर्यंत जाते.

2) साबणाच्या पाण्यामुळे - पावसाळ्यात आधीच सगळीकडे ओलावा असतो. अशात साबणाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. या पाण्यामुळे कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. जे नंतर आतपर्यंत जातं.

3) स्वीमिंगमुळे - पावसाळ्यात स्वीमिंग पूलसारखी ठिकाणं फंगल आणि बॅक्टेरियासाठी प्रजननाची स्थळं असतात. अशात स्वीमिंग पूलच्या पाण्यामुळे तुम्हाला सहजपणे इन्फेक्शन होऊ शकतं. या इन्फेक्शनमुळे कानात खाज आणि वेदना होऊ शकतात. याने नंतर समस्या वाढते. त्यामुळे पावसाळ्यात स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करणं टाळलं पाहिजे.

4) थंड पदार्थ खाल्ल्यामुळे - थंड पदार्थ खाल्ल्यामुळेही तुम्हाला कानात इन्फेक्शन होऊ शकतं. हे संक्रमण एडीनोइडमधून कानात होतं. तुमचे एडेनोइड तुमच्या नाकाच्या मागे तोंडाच्या आत वरच्या भागातील ग्रंथी आहेत. ज्या तुमच्या शरीराला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करतात. संक्रमण या ग्रंथींमधून तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या आजूबाजूला पसरू शकतं. याने कानात इन्फेक्शन होतं.

काय दिसतात लक्षणं?

- कानात झोपताना वेदना होणे

- झोप न लागणे

- आवाज ऐकणे किंवा प्रतिक्रिया देण्याची समस्या

- ताप

- कानातून द्रव्य पदार्थ निघणे

- डोकेदुखी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य