शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Monkey Fever : कर्नाटकात मंकी फीवरचा कहर; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं, कसा होतो प्रसार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:16 IST

Monkey Fever : कर्नाटकमध्ये 'क्यासानूर फॉरेस्ट डिसीज' (KFD) म्हणजेच मंकी फीवरमुळे एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटकमध्ये 'क्यासानूर फॉरेस्ट डिसीज' (KFD) म्हणजेच मंकी फीवरमुळे एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या आजाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. तिरथहल्ली तालुक्यातील रहिवासी असलेल्या या तरुणाचा २८ जानेवारी रोजी उडुपी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोग्य विभागाचे आयुक्त गुरुदत्ता हेगडे यांनी माहिती दिली की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. साधारणपणे जर संसर्ग झाल्यापासून एका आठवड्याच्या आत या आजाराचं निदान झालं, तर रुग्ण वाचण्याची शक्यता जवळपास १०० टक्के असते. या तरुणाला लक्षणं दिसताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि एका दिवसात निदानाची पुष्टीही झाली होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत त्याची प्रकृती स्थिर होती, मात्र अचानक तब्येत खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.

मंकी फीवर कसा पसरतो?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नावात 'मंकी' असलं तरी हा आजार थेट माकडांपासून माणसांना होत नाही. हा आजार मुख्यत्वे 'हेमाफिसॅलिस स्पिनिगेरा' नावाच्या एका विशिष्ट जंगली गोचीडामुळे पसरतो. खार आणि उंदीर यांसारखे प्राणी देखील या संसर्गाचे सोर्स असू शकतात. जेव्हा एखादा बाधित गोचीड चावतो किंवा एखादी व्यक्ती संसर्ग झालेल्या मृत माकडाच्या संपर्कात येते, तेव्हा हा आजार होतो. हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत नाही. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये याची सुरुवात होते आणि जानेवारी ते एप्रिल दरम्यान याचे प्रमाण सर्वाधिक असतं.

धोका का वाढतो?

जंगलात जाणे, प्राण्यांची हाताळणी करताना सुरक्षिततेची काळजी न घेणे किंवा ज्या भागात बाधित माकडांचा मृत्यू झाला आहे तिथे वावरणं, यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

प्रमुख लक्षणं

मंकी फीवरची लक्षणे साधारणपणे ३ ते ८ दिवसांत दिसून येतात:

थंडी वाजणं आणि खूप डोकेदुखी

नाक, घसा आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं.

लो ब्लड प्रेशर

प्लेटलेट्स आणि रक्तातील पेशींची संख्या कमी होणं

गंभीर प्रकरणांमध्ये काही मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणंही दिसू शकतात:

उलट्या आणि मळमळ

स्नायूंमध्ये कडकपणा

मानसिक गोंधळ किंवा भ्रम

दृष्टी कमकुवत होणं

मृत्यूदर आणि उपचार

मंकी फीवरचा मृत्यूदर साधारणपणे २ ते १० टक्के इतका आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. सध्या यावर कोणतेही विशिष्ट औषध नाही, त्यामुळे लक्षणांनुसार उपचार केले जातात:. रुग्णाला IV Fluids (सलाईन) दिले जातात. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पुरेसा आराम, प्रोटीनयुक्त आहार आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Monkey Fever Outbreak in Karnataka: Youth Dies, Symptoms & Transmission

Web Summary : A 29-year-old died in Karnataka due to Monkey Fever (KFD). Transmitted by infected ticks, not directly from monkeys. Symptoms include fever, headache, bleeding, and neurological issues. Early diagnosis improves survival. Treatment focuses on managing symptoms like providing IV fluids and rest.
टॅग्स :Karnatakकर्नाटकHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सDeathमृत्यू