मनी पेज : पर्यटन

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:38+5:302015-02-15T22:36:38+5:30

स्वाईन फ्लूमुळे क्षेत्राला

Money page: Tourism | मनी पेज : पर्यटन

मनी पेज : पर्यटन

वाईन फ्लूमुळे क्षेत्राला
५,५00 कोटींचे नुकसान
मुंबई : स्वाईन फ्लूमुळे राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांतील पर्यटन क्षेत्रास ५,५00 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. औद्योगिक क्षेत्रातील संघटना असोचेमने ही माहिती जारी केली आहे.
असोचेमने म्हटले की, राजस्थान आणि महाराष्ट्रातील स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. पर्यटनाबरोबरच विमान वाहतूक कंपन्यांनाही स्वाईन फ्लूचा फटका बसला आहे. स्वाईन फ्लूचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे. हिवाळ्यात राजस्थानात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यंदा स्वाईन फ्लूच्या साथीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाली. महाराष्ट्राचीही तीच गत झाली आहे.
असोचेमने एका अहवालात म्हटले आहे की, राजस्थानातील जयपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर आणि इतर अनेक जिल्ह्यांत येणार्‍या पर्यटकांत घट झाली आहे. हिवाळ्यात दिल्ली-आग्रा-जयपूर या सुवर्ण त्रिकोनात दरवर्षी सुमारे अडीच लाख विदेशी पर्यटक येतात. भारतात येणार्‍या एकूण पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३0 टक्के आहे. स्वाईन फ्लूमुळे या संख्येत मोठी घट होणार आहे.

Web Title: Money page: Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.