शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
3
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
4
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
5
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
6
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
7
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
8
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
9
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
10
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
11
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
12
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
13
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
14
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
15
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
16
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
17
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
18
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
19
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
20
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

'या' चुका तुमची किडनी आणि मुत्रपिंड कायमचं निकामी करु शकता, वेळीच ओळखा धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 18:25 IST

तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड निकामी किंवा खराब होऊ शकतं

किडनी शरीरातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. किडनी शरीरातून आम्ल बाहेर काढून पाणी, मीठ आणि खनिजे संतुलित करते. नसा, स्नायू आणि ऊतींचे योग्य संतुलन नसल्यास मानवी शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड निकामी किंवा खराब होऊ शकतं

वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापरनॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदना निवारक म्हणून काम करतात. पण बऱ्याच लोकांना माहिती नसते की, त्यांचा अतिवापर किडनीला खूप लवकर खराब करू शकतो. विशेषत: ज्यांना आधीच मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यामुळं वेदनाशामक गोळ्यांचा नियमित वापर कमी करा आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या घ्या.

मीठउच्च सोडियम (मीठ) असलेला आहार रक्तदाब वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टर जेवणात मीठ कमी वापरण्याची शिफारस करतात.

प्रक्रिया केलेले अन्न प्रक्रिया केलेले पदार्थ सोडियम आणि फॉस्फरसने भरलेले असतात, म्हणून त्यांचे सेवन केल्याने आपल्या किडनीला मोठे नुकसान होऊ शकते. उच्च फॉस्फरस असलेले प्रक्रिया केलेले अन्न केवळ आपल्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवत नाही, तर ते आपल्या हाडांसाठी घातक देखील ठरू शकते.

शरीराला हायड्रेटेड न ठेवणेशरीर हायड्रेटेड होत असताना विषारी घटक आणि अतिरिक्त सोडियम बाहेर पडतात. म्हणूनच आपण दिवसा पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. डॉक्टर म्हणतात की एका निरोगी व्यक्तीने दिवसातून सुमारे ४ ते ५ लिटर पाणी प्यावे.

साखरेचे अतिसेवनसाखरेचा जास्त वापर लठ्ठपणा वाढवतो आणि डायबिटीस, उच्च रक्तदाबाचा धोका देखील वाढवतो. या दोन्ही रोगांमुळे एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड खराब होऊ शकते. म्हणून, आपण गोड बिस्किटे किंवा ब्रेड यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे ज्यात जास्त साखर आढळते.

एकाच ठिकाणी बसून कामदिवसभर एकाच ठिकाणी बसून किंवा शरीर पूर्णपणे निष्क्रिय ठेवल्याने किडनीचे आजारही होऊ शकतात. अशा वाईट जीवनशैलीचा आपल्या किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. रक्तदाब आणि चयापचय योग्य ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह