एखाद्यासोबत जेवण करताना अनेकदा असं होतं की, समोरच्या व्यक्ती अन्न चावून खाण्याचा आणि घास गिळण्याचा आवाज फारच त्रासदायक वाटतो. जर तुम्हालाही असंच वाटत असेल आणि त्या आवाजामुळे तेथून निघून जाण्याचं मन करत असेल तर असं वाटणारे तुम्ही एकटे नाहीत. कारण ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळते. आणि या समस्येला मिसोफोनिया असं म्हणतात.

मिसोफोनिया एकप्रकारची मेंटल डिसऑर्डर आहे. ज्यात व्यक्तीला जेवताना घास चावण्याचा आवाज किंवा काही कुरकरीत खाल्ल्यावर होणाऱ्या आवाजाने त्रास होतो. ज्या व्यक्तीला ही समस्या असते, त्या व्यक्तीचा मेंदू लगेच अशाप्रकारचे आवाज कॅच करतो आणि नंतर हा आवाज बंद होईपर्यंत त्यांचं लक्ष त्या आवाजाकडेच राहतं.

(Image Credit : huffingtonpost.co.uk)

मिसोफोनियाच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्याचा आवाज, खातानाचा आवाज, पेनाचा टिक-टिक आवाज, घड्याळाच्या काट्यांचा आवाज, कुणाचा काही गिळण्याचा आवाज किंवा काही चाटण्याच्या आवाजांचा समावेश आहे. पण यात खाताना होणाऱ्या आवाजामुळे होणारा त्रास अधिक बघितला जातो. या आवाजामुळे व्यक्तीला मिसोफोनियाने ग्रस्त व्यक्तीला तणाव, राग आणि चिडचिड होऊ लागते.

(Image Credit : blogs.psychcentral.com)

रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, मिसोफनियाने ग्रस्त व्यक्तीसाठी घोरण्याचा आवाज, श्वास घेण्याचा आवाज किंवा कोणताही आवाज ऐकून त्याला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीचा तणाव इतका वाढतो की, कधी-कधी तो ओरडू लागतो किंवा फारच चिडून प्रतिक्रिया देतो. त्या व्यक्तीला घाम येऊ लागतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की, प्रत्येक व्यक्तीला कोणत्यातरी वेगळ्या आवाजाने त्रास होत असतो.

(Image Credit : independent.co.uk)

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये मिसोफोनिया होण्याचं कोणतंही वैज्ञानिक कारण स्पष्टपणे समोर येऊ शकलं नाही. हा रिसर्च Current Biology sheds मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अभ्यासकांनी रिसर्चमध्ये ४२ लोकांना सहभागी करून घेतले होते, ज्यात २२ लोक मिसोफोनियाने ग्रस्त होते. सध्या या विषयावर रिसर्च सुरू आहे. 

(Image Credit : abc.net.au)

मिसोफोनिया एक असा विकार आहे, ज्यात पीडित व्यक्ती ना केवळ असे आवाज ऐकून विचलित होतो तर त्याला पूर्णपणे अशी स्थिती टाळायची असते. अभ्यासकांना आढळलं की, मिसोफोनियाने पीडित लोकांच्या ब्रेनचा Anterior Insular Cortex (AIC) हा भाग ज्याने भावना नियंत्रित केल्या जातात, तो मिसोफोनियाने ग्रस्त लोकांमध्ये अधिक अ‍ॅक्टिव होता. रिसर्चमधून समोर आले की, जे लोक मिसोफोनियाने ग्रस्त आहेत, त्यांना त्यांच्या डेली रुटीन लाइफमध्ये अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते.


Web Title: Misophonia is the reason why hate the sound of chewing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.