आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 18:59 IST2020-10-06T18:54:11+5:302020-10-06T18:59:29+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आयुष-64 हे औषध कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे सांगितले आहे. नवीन गाईडलाईन्समध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांसाठी काही पोस्ट कोविड प्रोटोकॉल्स देण्यात करण्यात आले आहेत.

आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनासोबत जगत असताना रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टी माहीत असायला हव्यात. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आयुषमंत्री श्रीपद नायक यांनी आज कोरोना व्हायरसच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी तसंच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नवीन गाईडलाईन्स दिल्या आहेत. या नवीन प्रोटोकॉल्सनुसार काही गुणकारी औषधांच्या सेवनाने कोरोनापासून बचाव होऊ शकतो असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयुष-64 हे औषध कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे सांगितले आहे. नवीन गाईडलाईन्समध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांसाठी काही पोस्ट कोविड प्रोटोकॉल्स देण्यात आले आहेत. आयुष विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना सगळ्या प्रकारच्या रुग्णांना एलोपॅथी रुग्णालयात दाखल केलं जात आहे. एलोपॅथी डॉक्टर आयुष औषधं लोकांना देत आहेत. अजूनही सगळ्या रुग्णांपर्यंत ही औषध पोहोचलेली नाहीत. तज्ज्ञांनी सांगितले की, याचा लाभ सगळ्याच रुग्णांना मिळायला हवा. त्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे.
अश्वगंधा आणि च्यवनप्राश खाल्याने कोरोनाला दूर ठेवता येऊ शकतं
आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी रोज अश्वगंधा १-३ ग्राम एमजी एक्स्ट्रॅकचा वापर करायला हवा. याशिवाय गरम पाणी किंवा दूधासह १० ग्राम च्यवनप्राशचे सेवन करायला हवे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना आयुष -64 गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाची हलकी लक्षणं म्हणजेच ताप, खोकला, घसादुखी, अतिसाराची समस्या उद्भवत असेल तर गुडुची, पीपली यांचे दोनवेळा सेवन करायला हवे. याव्यतिरिक्त आयुष-64 चे औषध ५०० एमजी च्या दोन कॅप्सूल १५ दिवसांपर्यंत घ्यायला हव्यात. विशेष प्रकारचे योगा, व्यायाम करायला हवेत. त्यासाठी ४५ मिनिटं, ३० मिनिटं वेळ काढायला हवा. योगशिक्षकांच्या निरिक्षणाखाली योगा प्रकार केल्यास शरीरासाठी उत्तम ठरेल.
coronavirus: भारतात वृद्धांपेक्षा तरुणांमध्येच दिसून आला कोरोनाचा कहर, समोर आली धक्कादायक आकडेवारी
जाणून घ्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या गाईडलाईन्स
कमीत कमी ३० मिनिटांपर्यंत योगा किंवा ध्यान करणं आवश्यक आहे.
जेवण बनवत असताना हळद, जीरं, धणे यांचा जास्तीत जास्त वापर करा.
डायबिटीस असलेल्या रुग्णांनी साखर नसलेल्या च्यवनप्राशचे सेवन करावे.
दिवसातून दोनवेळा हर्बल टी, तुळशी, दालचीनी, कालीमीरी, सुकलेल्या आल्याच्या काढ्याचे सेवन करा.
हळदीचे दूध प्या. चिंताजनक! कोरोना संक्रमणानंतर उद्भवू शकते 'लॉन्ग कोविड' ची समस्या; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा