(Image Credit : thebalancecareers.com)
मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या अलिकडे इतक्या वेगाने वाढत आहेत की, साऱ्या जगाने याकडे गंभीरतेने बघायला सुरूवात केली आहे. यात कारणे ऑक्टोबर महिन्याला मेंटल हेल्थ अवेअरनेस महिना घोषित करण्यात आलाय. मात्र, मानसिक आरोग्य एक असा विषय आहे, ज्याकडे लोक फार लक्ष देत नाहीत. आजही आपल्या समाजात मेंटल हेल्थबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव बघायला मिळते. खासकरून वर्कप्लेस आणि रिलेशनशिप संबंधित भावनात्मक दबावाचे मुद्दे फारच लाइटली घेतले जातात.
डिपार्टमेंट ऑफ हेल्थनुसार, जगभरात साधारण ४०० मिलियन लोक कोणत्या ना कोणत्या मेंटल आणि न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरने पीडित आहेत किंवा सायकॉलॉजीकल समस्यांचा सामना करत आहेत. या समस्यांमध्ये स्ट्रेस डिसऑर्डर, ऑबसेसिव्ह कम्पल्सिव डिसऑर्डर, पॅनिक अटॅक, पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे.
वर्षातील एक महिना मानसिक आरोग्याला डेडिकेट करण्याचा उद्देश हाच आहे की, लोकांना मानसिक आरोग्याबाबत जास्तीत जास्त माहिती दिली जावी. पण गोष्टी अजून तेवढ्या चांगल्या प्रकारे केल्या जात, जेवढ्या करायला पाहिजे. आपल्या जीवनात स्ट्रेस आणि डिप्रेशन केवळ पर्सनल कारणांनी येत नाही तर प्रोफेशनल कारणांचा देखील यात मोठा हात असतो.
वर्कप्लेसचं वातावरण, कामाचा अधिक दबाव, क्षमतेपेक्षा अधिक काम करणे, सहकाऱ्यांसोबत नातं या सर्वच गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दबाव जाणवत असेल तर सर्वातआधी त्यावर उपाय शोधायला पाहिजे.