शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

स्त्री अन् पुरुषांमध्ये एकाच आजाराची दिसतात वेगवेगळी लक्षणं, विश्वास बसणार नाही पण आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 17:15 IST

स्त्री व पुरुष या प्रमाणे वेगवेगळ्या आजारांची लक्षणे बदलत जातात. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत ज्यात स्त्री व पुरुषांमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात. ​​​​​​​

असे अनेक आजार आहेत ज्यांची लक्षणं महिला व पुरुषांमध्ये वेगवेगळी दिसतात. काही आजारांचा धोका हा पुरुषांना जास्त असतो तर काही आजारांचा धोका महिलांना जास्त असतो. स्त्री व पुरुष या प्रमाणे वेगवेगळ्या आजारांची लक्षणे बदलत जातात. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत ज्यात स्त्री व पुरुषांमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात.स्ट्रोक- स्ट्रोक हा असा आजार आहे ज्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ५२ टक्क्यांनी जास्त असते. याचं कारणं असं की स्त्रियांना गर्भधारणेच्या दिवसांदरम्यान हाय ब्लड प्रेशरचा सामना करावा लागतो. काही महिला गर्भनिरोधक गोळ्याही घेतात ज्या ब्लड प्रेशर वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्याबरोबरच मायग्रेनमुळेही स्ट्रोकचा धोका वाढतो. अशक्तपणा, बोलण्यात अडथळा येणे, नीट उभे राहु न शकणे आदी सामान्य लक्षणे दिसतात. तर स्त्रियांमध्ये चक्कर येणे, उलट्या, भीती वाटणे, दुखणे आदी लक्षणे दिसून येतात.

मल्टीपल स्केलरोसिस- हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पण याची वाढ महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त वेगाने होते.

स्ट्रेस- अधिक महिलांचे असे म्हणने आहे की पुरुषांपेक्षा त्यांना स्ट्रेसचा सामना अधिक करावा लागतो. ताण आल्यामुळे राग येणे स्नायुंवरती ताण येणे आदि लक्षणे स्त्री व पुरुष दोन्हींमध्ये सारखी असतात. पण स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत शारिरक लक्षणे अधिक दिसतात. स्त्रियांमध्ये डोकेदुखी, पोटदुखी, डोळे दुखणे आदी समस्या जाणवतात.

मुरुमं- स्त्रियांच्या जीवनामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉज आदी टप्पे येतात. या टप्प्यांमध्ये हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतो. त्यामुळे स्त्रियांना मुरुम जास्त प्रमाणात येतात. तसेच याचे उपचारही पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे असतात. जसे की, स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान मुरुम येतात. त्याचे उपचार वेगळे असतात. तर पुरुषांमध्ये ती काही क्रिम्सची अॅलर्जी असु शकते त्यामुळे त्यांचे उपचार वेगळे असतात.हार्ट अटॅक-हार्ट अटॅकचा धोका पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत जास्त असतो. हार्वड हेल्थ पब्लिशिंग यांच्या २०१६ च्या रिपोर्टमध्ये हे नमुद केलेले आहे. हृदयाचा ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने छातीत दुखणं, छातीवर भार आल्यासारखं वाटणं आदि लक्षण पुरुषांमध्ये दिसतात. तर स्त्रियांमध्ये जबड्यात दुखणे, श्वास घेताना त्रास, चक्कर येणे आदी लक्षणे दिसतात. तसेच जर महिलांना हार्ट अॅटॅक झाला तर त्यांच्या वाचण्याची शक्यता ही पुरुषांच्या तुलनेत कमी असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स