शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मेलेडी सॉंग्स इज बॅक अगेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 04:33 IST

मै तेनू सम जावं की ना तेरे बिन लगदा जी...अक्षरश: अलिया भटच्या या गाण्याला तरुणाईने उचलून धरले आहे. तरुणांच्या मनाच्या कप्प्यापासून ते मोबाईलच्या रिंगटोनपर्यंत याच गाण्याची चर्चा मध्यंतरी दिसत होती. तसेच श्रद्धा कपूरने गायलेले सुन रहा है ना तू, हे गाणे तर लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांच्या ओठी हे गुणगुण करू लागले होते. हळूहळू या मेलेडी साँग्जचा प्रभाव मराठी इंडस्ट्रीतदेखील दिसू लागला.

मै तेनू सम जावं की ना तेरे बिन लगदा जी...अक्षरश: अलिया भटच्या या गाण्याला तरुणाईने उचलून धरले आहे. तरुणांच्या मनाच्या कप्प्यापासून ते मोबाईलच्या रिंगटोनपर्यंत याच गाण्याची चर्चा मध्यंतरी दिसत होती. तसेच श्रद्धा कपूरने गायलेले सुन रहा है ना तू, हे गाणे तर लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांच्या ओठी हे गुणगुण करू लागले होते. हळूहळू या मेलेडी साँग्जचा प्रभाव मराठी इंडस्ट्रीतदेखील दिसू लागला.जसे की, मेलेडी या गाण्यांचे बॉलिवूडमध्ये जेवढे वजन आहे तेवढेच वजन मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील आहे. पूर्वी मराठी गाणे हे ज्येष्ठ नागरिकच ऐकतात अशी समजूत होती. परंतु कालांतराने यात खूप बदल झाला. कारण मराठी इंडस्ट्रीचा चढता आलेख पाहता चित्रपट जेवढे हिट होतात तेवढीच गाणीदेखील प्रसिद्ध होत चालली आहेत. त्यापलीकडे जाऊनही काही मेलेडी साँग्जमुळेच काही वेळा चित्रपट ओळखले जाऊ लागल्याचेदेखील दिसते. पण हा मेलेडी शब्द सध्या लोप पावत चालला असला, तरी या शब्दाला बदलत्या लाइफ स्टाइलनुसार आजच्या तरुणाईने अनप्लग साँग हा नवीन शब्द जन्माला घातला आहे. खरं तर गाणी त्याच स्वरूपाची असतात पण जनरेशननुसार गाण्यांना विशेष नावे दिली गेली आहेत. पूर्वी या गाण्यांना मेलेडी साँग तर नव्वदीमध्ये याच गाण्यांना तरुणाई सॅड साँग म्हणून मिरवत होती. आणि आता तर सध्याची तरुणाई थेट अनप्लग साँग असा थेट शब्द वापरत आहे. ऐकायला हा शब्द जरा भारीच वाटतो. असो. चला तर, मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व तरुणांची मनं जिंकणारी काही मराठी अनप्लग साँग पाहूयात. रवी जाधव दिग्दर्शित बालक-पालक या चित्रपटातील का कळेना अशी हरवली पाखरे या मेलेडी साँगला तर तरुणांनी थेट मोबाईलची रिंगटोनच बनविली. हे अनप्लग साँग शांत, एकांतातही मनाला आनंद देऊन जाते. त्यामुळेच कॉलेजियन्समध्ये अशा मेलेडी गाण्यांची देवाण-घेवाणदेखील मोठ्या प्रमाणात होते.संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे या चित्रपटात तेजिस्वनी पंडित व सई ताम्हणकर या दोघींनी म्हटलेले तोला तोला या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील हे गाणे अधिक फायदेशीर असल्याचे दिसले. प्यारवाली लव्हस्टोरीमधील जरा जरा दीवानापन, जरा मिठी चुबन हे अनप्लग साँगदेखील तेवढेच हिट झाले.  नटरंगमधील खेळ मांडला हे गाणे तर अजूनही चर्चेत असल्याचे दिसते. म्हणजेच एखाद्या गाण्यातल्या धांगडधिंगापेक्षा काही मेलेडी गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरतात. तसेच बेस्ट पियानोवर वाजलेले किंवा त्या प्रेमळ गाण्यात वाजलेला हलकासा ड्रम या स्ट्रीगच मनाला अगदी भावणारीदेखील असते त्यामुळे तरुणाईदेखील हे गाणे जगतात असे म्हणयला हरकत नाही. सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील अतुल कुलकर्णी व सागरिका घाटगे या जोडीचा रोमान्स दाखविणारे ओल्या सांजवेळी या गाण्याने तर तरुणांना वेड लावून ठेवले होते. या चित्रपटापेक्षा हे गाणेच सुपरहिट ठरले होते. फॅशन, म्युझिक, सॉफ्ट,रोमान्स यामध्ये थोडा बदल होऊन गाणी तयार होत आहे. फक्त वेगवेगळया नावाने ते बाहेर पडत आहेत.या गाण्यात जास्त वादयवृंद नसल्यांमुळे तरूणाईच्या ती पसंतीस पडत आहेत. त्यामुळे मेलडी इज बॅक असे म्हणण्यास हरकत नाही.                                                                                                                       - दिनकर शिर्के,संगीतकारअनप्लग साँगच आजच्या तरुणाईला पसंत पडत आहे. त्यामुळे हा एक ट्रेडच चालू आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच या गाण्यात रोमान्स व एक प्रकारची शांतता असते. त्यामुळेच तर ती तरुणांना भावते. ही मेलेडी गाणी सध्या वेगवेगळ्या पॅटर्नमधून बाहेर येत असल्याचेदेखील दिसते.                                                                                                                    - हर्षित अभिराज, संगीतकार