शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भारतीय प्रजातीचा बहुगुणी पाडळ वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:28 IST

शरीरात दुषित पित्त साचते तेव्हा फुलांचे चूर्ण देतात. किंवा फळाचे चूर्णसुद्धा औषध म्हणून वापरल्यास आराम मिळतो. पित्त विकारात पानांचा रसात सुंठ पूड आणि साखर घालून घेण्याची प्रथा आहे. मुतखड्यात पंचाग म्हणजे पाडळ वृक्षांचे मूळ साल, पान, फुल, फळ जाळून सार बनवितात.

ठळक मुद्देअशक्तपणात गुलकंद उत्तम उपयोगी औषध आहे.पाडळच्या फुलांचा गुलकंद बनवितात.

पाडळ हा भारतीय प्रजातीचा उंच वाढणारा बहुगुणी वृक्ष आहे. या वृक्षाच्या तीन प्रजाती आहेत. औषधात तांबड्या गुलाबी फुलांच्या वृक्षांच्या साल, मुळ, पानांचा उपयोग केला जातो. शेंगा लांब, गोलाकार असतात. त्यात बारीक उडून जाणारे पंखयुक्त बीया असतात. पाडळची फुले पाण्यात ठेवल्यास पाण्यालासुद्धा सुगंध येतो. फुलांचा मोहक सुगंध तांबडा रंग आणि मधयुक्त असल्यामुळे मधमाशा, भुंगे, किटक त्याकडे आकर्षित होतात. मधमाशापालनासाठी या वृक्षांची लागवड पुरक ठरते. . पाडळच्या मुळांचा उपयोग दशमूळ नावाच्या औषधात जास्त प्रमाणात केला जातो. पाडळच्या फुलांचा गुलकंद बनवितात. हा गुलकंद अतिशय पौष्टिक असतो. अशक्तपणात गुलकंद उत्तम उपयोगी औषध आहे. शरीरात दुषित पित्त साचते तेव्हा फुलांचे चूर्ण देतात. किंवा फळाचे चूर्णसुद्धा औषध म्हणून वापरल्यास आराम मिळतो. पित्त विकारात पानांचा रसात सुंठ पूड आणि साखर घालून घेण्याची प्रथा आहे. मुतखड्यात पंचाग म्हणजे पाडळ वृक्षांचे मूळ साल, पान, फुल, फळ जाळून सार बनवितात. कॉलरामुळे अतिसारात पोटात दुखावा होतो अशावेळी पाडलाची मूळ पाण्यात घासून पाजावे. पंचागांचा सार मधुमेहात सुद्धा उपयोगी ठरतो. औषधी वापर करण्यापुर्वी वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावारक्तपित्तात तसेच हृदयरोगावर पाडळची फुले वापरतात. मुर्छा रोगात फुलांचा रस मधात घालून चाटण दिले जाते. शरीरात व्रण पडून घाव होतात. अशावेळी पानांचा लेप करतात. जनावरांच्या जखमासुद्धा या लेपाने कोरड्या होतात. त्वचारोगातदेखील पाडळ वृक्ष उपयोगी आहे. त्वचारोगात पाडळाची साल तेलात उगाळून तेल गाळून त्वचारोगावर वापरतात. लहान मुलांच्या पोटदुखीत पाडळाचे मूळ पाण्यात घासून सागरगोटा घासून हे मिश्रण पोटातून देतात. फुरसा सर्पाच्या विषावर पाडल वृक्षाचे मूळ घासून पाजतात. वात विकारात पाडळ मुळाचा काढा करून या काढ्याबरोबर थोडे सुंठ पावडर घालून सेवन केल्यास वात कमी होतो. मुर्छा येते तेव्हा फुलांचा रस किंवा कोरडे फुले असतील तर चूर्ण मधात घालून चाटतात. पाडळ हा वृक्ष अत्यंत दुर्मिळ झाला आहे. पाडळ हा पानगळी वृक्ष असून या वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाडळाच्या बियांपासून अधिकाधिक रोपनिर्मिती झाल्यास या वृक्षाची संख्या शहरालगतच्या जंगलांमध्ये वाढू शकते. हा वृक्ष मोकळ्या जागेत, उद्यानात सहज लावणे शक्य आहे

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सNashikनाशिक