मनब्दा येथे २४ ग्रामस्थांकडून दंड वसूल

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

गुड मॉर्निंग पथकाची कारवाई

Manbada receives penalties from 24 villages | मनब्दा येथे २४ ग्रामस्थांकडून दंड वसूल

मनब्दा येथे २४ ग्रामस्थांकडून दंड वसूल

ड मॉर्निंग पथकाची कारवाई
तेल्हारा : तालुक्यातील मनब्दा येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंचायत समितीचे सहनियंत्रण अधिकारी ११ डिसेंबरला सकाळी ५ वाजतापासून मनब्दा येथील गोदरीमध्ये गस्त घालून बसले होते. यावेळी उघड्यावर शौचास बसलेल्या तब्बल २४ ग्रामस्थांवर सहनियंत्रण अधिकारी एस. एन. ढगे (वि. स. सां.), ग्रामसेवक एस. एम. भांबुरकर, ग्रामसेवक के. आर. जवंजाळ, स्वच्छ भारत कक्षातील कर्मचारी अमोल नवघरे, शिवशंकर उन्हाळे, प्रशांत दोडेवार यांनी दंडात्मक कार्यवाही केली. यावेळी कैलास आगरे, नितीन गडम, राजाराम थोटे, श्याम रणसिंगे, माणिक गडम, मधू साबळे, विनोद तायडे, सिद्धार्थ वानखडे, बाळू तायडे, गणेश गडम, सचिन तायडे, सुनील रघुवंशी, विपूल तायडे, अरुण बावणे, तुळशिराम इंगळे, रामभाऊ मोरे, सहदेव बावणे, गौतम तायडे, मधुकर बावणे, राजेश पार्थीकर, देवीदास पार्थीकर, बाळू पार्थीकर, पवन बावणे यांच्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असल्याचे गटविकास अधिकारी यांनी कळविले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Manbada receives penalties from 24 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.