शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

Lung Cancer Awareness Month : 'ही' असू शकतात फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 2:09 PM

नोव्हेंबर महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा करण्यात येतो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर. हा एक गंभीर आजार आहे.

नोव्हेंबर महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा करण्यात येतो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर. हा एक गंभीर आजार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (World Health Organization) केलेल्या एका सर्वेनुसार, जवळपास  7.6 मिलियन लोकांचा मृत्यू फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होतो. हा आजार झाल्यास अनेक लक्षणं दिसून येतात. त्यातील सर्वत महत्त्वाचं लक्षण म्हणजे वारंवार येणारा खोकला. जर या खोकल्यावर उपचार करूनदेखील तो बरा नाही झाला तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्याने काही तपासण्या करून घ्या. 

धुम्रपान करणाऱ्या आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना लंग कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. परंतु हा गंभीर आजार याव्यतिरिक्त इतरही अनेक कारणांमुळे होतो. फुफ्फुसांमध्ये होणारा कॅन्सर सुरुवातीला ओळखणं अशक्य असतं. कारण सुरुवातीला या आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत. जाणून घेऊयात कोणती लक्षणं आहेत ज्यांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार करणं शक्य होतं. 

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :

- जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळी जर शिटीसारखा आवाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आवाजामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरप्रमाणेच इतरही आजारांचा धोका असतो. 

- जर तुम्हाला खोल किंवा लांब श्वास घेताना त्रास होत असेल तर हे फुफ्फुसांमध्ये घम जमा असण्याचं कारण असू शकतं. ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

- चेहरा आणि घश्यामध्ये सूज असणंही लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर अचानक घसा किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- कॅन्सर वाढल्याने सांधेदुखी, पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास होतो. अनेकदा हाडं फ्रॅक्चरही होतात. 

- जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबतच पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास सतावत असेल तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. 

- कफ झाला असेल आणि खूप औषधं घेऊनही तो बरा होत नसेल. तर हे संक्रमण असू शकतं. याव्यतिरिक्त कफ संबंधातील इतर समस्या म्हणजे थुंकीतून रक्त पडतं असेल तर वेळीच तपासणी करून घ्या. 

- फुफ्फुसांच्या कॅन्सरचा परिमाण मेंदूवरही होतो. अशा परिस्थितीमध्ये जर सतत डोकेदुखीचा त्रास सतावतो. 

- अनेकदा शरीरातील कॅल्शिअमची मात्रा अधिक होते. ज्यामुळे रक्त गोठण्यास सुरुवात होते. हे देखील लंग कॅन्सर होण्याचं एक कारण असू शकतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य